Success Story: स्वतःवरील विश्वास आणि कठीण परिश्रम कधीही वाया जात नाहीत. भारतात असे अनेक दिग्गज उद्योजक आहेत, ज्यांनी हातात फारसे भांडवल नसतानादेखील आपली मोठमोठी स्वप्नं साकारण्यासाठी कठीण परिश्रम घेतले आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे स्वप्न साकारले. आज आम्ही तुम्हाला अशाच एक उद्योजकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत.

साकेत दंडोतिया हा मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो एक यशस्वी उद्योजक असून त्याची एकूण संपत्ती तब्बल ६०० कोटी रुपये आहे. साकेतने एका छोट्या शहरातून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती, मेहनतच्या जोरावर आणि आव्हानांवर मात करून त्याने हे यश मिळवले आहे.

IAS Sreenath, Success Story
Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Shiju Pappen Business Success Story
Success Story: ५००० ची नोकरी करण्यापासून ते आठ कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
loksatta analysis pune witnesses alarming rise In crime rate
पुणे गुन्हेगारीत नाही उणे! राज्याची सांस्कृतिक राजधानी असंस्कृत, असुरक्षित का बनतेय?
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
Success Story Of Varun Baranwal
Success Story : वडिलांचा गेला आधार, स्वत: उचलली जबाबदारी; सायकल दुरुस्तीचं काम करणारा बनला आयएएस अधिकारी
IAS officer Ram Bhajan Kumhar
Success Story: ‘जिद्द असावी तर अशी…’ राहण्यासाठी नव्हते घर, रोजंदार कामगार म्हणून केलं काम अन् UPSC परीक्षेत पटकावला ६६७ वा क्रमांक
Ulhasnagar, Kumar Ailani, kalani family, BJP MLA Kumar Ailani, Kumar Ailani news, Ulhasnagar latest news,
उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष

साकेत दंडोतियाने एकेकाळी कॉमिक्स भाड्याने देऊन पैसे कमवण्यापासून ते इंदूर आयटी पार्कमध्ये स्वतःची कंपनी स्थापन करण्यापर्यंत नेहमीच आपले उद्योजकीय कौशल्य दाखवले आहे. त्याला बारावीच्या परिक्षेत कमी गुण मिळाले आणि आयआयटी जेईई परिक्षेतही अपयश आले. मात्र, खचून न जाता त्याने एमआयटीएस इंदूर येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम केल्यानंतर साकेतने २०१२ मध्ये नोकरी सोडून स्वतःची Linkites ही कंपनी सुरू केली.

ही कंपनी सुरू झाली तेव्हा साकेतबरोबर फक्त सहा कर्मचारी होते. Linkites कंपनीला हळूहळू यश मिळू लागले आणि अवघ्या तीन वर्षांत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या १५० पर्यंत पोहोचली. या काळात अनेक अडचणी येऊनही साकेतने हार मानली नाही. इंदूर आयटी पार्कमध्ये आपली उपस्थिती नोंदवणारी ही पाचवी कंपनी ठरली. या ठिकाणी साकेतने १२,००० चौरस फुटांचे कार्यालय उभारले. कालांतराने Linkites जगभरात विस्तारले. सिंगापूर, यूएसए, जपान आणि भारतातील काही ठिकाणी या कंपनीची कार्यालये उभी राहिली. सध्या या कंपनीत ८०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

हेही वाचा: Success Story: दिल्लीतील भाजीविक्रेत्याने करोना काळात गावी जाऊन सुरू केली शेती; महिन्याला कमावतो लाखो रुपये

यशात आई आणि पत्नीचा वाटा

साकेत दंडोतिया त्याला मिळालेल्या यशाचे श्रेय त्याच्या आई आणि पत्नीच्या पाठिंब्याला देतो, या दोघींनी साकेतला प्रत्येक अडचणीत साथ दिली होती. २०१६ मध्ये त्याने आणखी एक स्टार्टअप Videoverse लाँच केला. यानंतर साकेतने OneTab हा नवीन उपक्रम सुरू केला.
सध्या साकेतची एकूण संपत्ती ६०० कोटी रुपये आहे.