Success Story: अभय सोई हे मॅक्स हेल्थकेअरचे प्रमुख आहेत. परंतु, त्यांनी आयआयटी किंवा आयआयएमसारख्या मोठ्या संस्थांमधून शिक्षण घेतलेले नाही. तरीही त्यांनी या क्षेत्रात अब्जावधींचे व्यावसायिक साम्राज्य उभारले आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम नेट वर्थनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे २२७ कोटी रुपये आहे. तसेच फोर्ब्स इंडियाने त्यांना ‘२०२३ चा उद्योजक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. अशा या यशस्वी उद्योजकाचा प्रवास आपण जाणून घेऊ.
अभय सोई हे मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी हॉस्पिटल साखळी आहे. सोई यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आर्थर अँडरसन येथे केली. तिथे ते कंपन्यांना आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत करायचे. त्यानंतर त्यांनी EY आणि KPMG मध्येही काम केले. मग त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यशस्वी प्रवासाला सुरुवात
अभय सोई यांनी अमेरिकन अब्जाधीश सेठ क्लारमन यांच्या गुंतवणूक फर्म बाउपोस्ट ग्रुपसाठी सुमारे १,८८० कोटी रुपये निधीदेखील सुरू केला. २००९ मध्ये सोईने आरोग्यसेवा क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी आपल्या अनुभवांचा वापर केला आणि या नवीन क्षेत्रात यश मिळवले. २०१० मध्ये त्यांनी दिल्लीत एक अडचणीत सापडलेले ६५० खाटांचे रुग्णालय विकत घेतले. नंतर ते रेडियंट लाईफ केअरमध्ये बदलण्यात आले. त्यानंतर जून २०२० मध्ये ते मॅक्स हेल्थकेअरमध्ये विलीन झाले. फक्त दोन महिन्यांनंतर, विलीन झालेली कंपनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध झाली. सोई यांच्या उद्योजकीय प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
अभय सोई यांची संपत्ती
अभय सोई यांना फोर्ब्स इंडियाने ‘२०२३ चा उद्योजक’ हा किताब दिला आहे. फोर्ब्सच्या मते, सोईची एकूण संपत्ती सुमारे २२७ कोटी रुपये आहे. सोईची आलिशान जीवनशैलीदेखील चर्चेचा विषय राहिली आहे. २०१९ मध्ये त्यांनी मुंबईतील थ्री सिक्स्टी वेस्ट कॉम्प्लेक्समध्ये दोन आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. एका फ्लॅटची किंमत ५४ कोटी रुपये होती, तर त्यांच्या पत्नी तरुणा सोई यांनी दुसऱ्या फ्लॅटसाठी ५७.२५ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय सोईंकडे त्याच इमारतीत १० कार पार्किंगची जागादेखील आहे.