Success Story: स्वप्न साकारणाऱ्यांसाठी परिस्थिती अन् वय कधीही आड येत नाही. देशात प्रत्येक वर्षी अनेक जण स्पर्धा परीक्षा देतात; ज्यात काहींना यश, तर काहींच्या हाती अपयश येते. फक्त संघर्ष, जिद्द कायम ठेवावी लागते. IAS मोहम्मद अली शिहाब यांचा टोपल्या विकण्यापासून ते भारताचा अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. IAS मोहम्मद यांनी आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट केले. शिहाब यांचा प्रवास आयुष्यातील कठीण काळातून जात असलेल्या लोकांना प्रोत्साहन देणारा आहे.

गरीब कुटुंबात जन्म

IAS मोहम्मद अली शिहाब यांचा जन्म मल्लापुरम जिल्ह्यातील एडवन्नापारा येथील एका गावात झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूप हलाखीची होती. कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लहान वयातच वडिलांबरोबर काम करावे लागले. तसेच १९९१ मध्ये त्यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईकडे कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी पुरेसे पैसे, चांगली नोकरी नव्हती. त्यामुळे शिहाब यांच्या आईने त्यांना अनाथाश्रमात पाठवले. शिहाबने या अनाथाश्रमात अनाथ मुलांसोबत १० वर्षे राहिले. या काळात त्यांनी वाचन आणि अभ्यास सुरू केला.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Success Story Of Anudeep Durishetty In Marathi
Success Story Of Anudeep Durishetty : गूगलची सोडली नोकरी, UPSC परीक्षेत तीन वेळा आलं अपयश; वाचा, देशात पहिला आलेल्या अनुदीप दुरीशेट्टीची गोष्ट
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

हेही वाचा: Success Story : कष्टाचे फळ मिळालेच! नांदेड ते कोटा… परीक्षेत ३५० गुणांसह पास होणाऱ्या आयआयटी-जेईई टॉपरला भेटा!

२१ सरकारी परीक्षा क्रॅक केल्या

अनाथाश्रमात असताना त्यांनी आयुष्यात काहीतरी मोठे करायचे, असे स्वप्न पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्याला आर्थिक स्थिरता आवश्यक होती. म्हणून त्यांनी सरकारी कार्यालयाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केला आणि २१ वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यांनी वन विभागात शिपाई, कारागृह वॉर्डन व रेल्वे तिकीट परीक्षक म्हणूनही काम केले. तसेच वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी सुरुवातीला UPSC परीक्षा दिली. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आले. तरीही ते हार न मानता प्रयत्न करीत राहिले. शिहाब यांनी २०११ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण करून ऑल इंडिया २२६ वी रँक मिळवली.

Story img Loader