Success Story: आयुष्यात ज्या व्यक्तींना काहीतरी मोठं करायची इच्छा असते, ते लोक सर्व आव्हानांना सामोरे जातात. अनेकदा परिस्थितीमुळे खचून जाऊन लोक हार मानतात. पण, समाजात असेही अनेक लोक आहेत, जे अशा सर्व आव्हानांवर मात करतात. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, जे एकेकाळी दिवसाला केवळ सात रुपये कमावायचे आणि आता ते तीन कोटींचा व्यवसाय सांभाळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरदीप यांचा जन्म बिहारमधील एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते एका स्थानिक हॉटेलमध्ये काम करायचे, जिथे त्यांना दिवसाला फक्त सात रुपये मजुरी मिळायची. एवढ्याशा पैशांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता, त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये वेटरपासून ते भांडी धुण्यापर्यंत अनेक कामे केली. परंतु, या संघर्षानंतरही त्यांनी शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले.

१९८९ ते १९९६ या काळात हॉटेलमध्ये काम करत असताना अमरदीप यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. तसेच यावेळी इतर मुलांची शिकवणीही घेतली. त्यानंतर ते आधी पाटणा आणि नंतर दिल्लीला गेले. त्या ठिकाणी जाऊन नागरी सेवा परीक्षा दिली. पण, त्यांना या परीक्षेत यश मिळाले नाही.

समाजासाठी काहीतरी करण्याची होती इच्छा (Success Story)

पुढचे शिक्षण घेतल्यानंतर बेंगळुरूमध्ये कॉर्पोरेटमध्ये त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. पण, तिथे काम करतानादेखील त्यांचे मन समाधानी नव्हते. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रेरणेने त्यांच्यात वंचितांना मदत करण्याची तीव्र इच्छा होती.

हेही वाचा: Success Story: संघर्षाला साथ कष्टाची! ३३ वेळा परीक्षेत अनुत्तीर्ण होऊनही हार न मानता मारली IPS मध्ये बाजी; जाणून घ्या आदित्य कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

अमरदीप यांची पत्नी डॉ. हेमलता सिंह या बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएचडी आहेत. त्यांनी त्यांना बिहारमध्ये परत येण्यासाठी आणि समाजाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले. ते रामपूर समथूमध्ये परतले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी एका एनजीओची उभारणी केली. २०१९ मध्ये अमरदीप यांनी सहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून ‘मोरंग देश व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ची स्थापना केली. ही कंपनी विविध प्रकारच्या अगरबत्ती बनवते. त्यांच्या व्यवसायात आता १०० हून अधिक स्थानिक कामगार आहेत. त्याची वार्षिक उलाढाल तीन कोटी रुपये आहे. अमरदीप यांची कंपनी मंदिरातील टाकाऊ फुलांचा वापर करून पर्यावरण रक्षणाचा प्रचार करते. अमरदीप यांची ही कथा परिस्थितीमुळे हार मानणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story amardeep kumar earn only seven rupees a day and now manages a three crore business sap