Success Story: अनेकदा एखाद्या वाईट अनुभवातूनही आपल्यासाठी चांगलं काहीतरी निर्माण होतं. असे अनेक खरे किंवा खोटे किस्से आपण याआधीही ऐकले किंवा चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून पाहिले असतील. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी बजरंग यादव यांच्या वडिलांसोबत घडली. काही गुंडांनी त्यांची हत्या केली, त्यावेळी बजरंग यादव यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वडिलांची हत्या करणाऱ्या नराधमांना एक दिवस शिक्षा करणार असल्याची शपथ घेतली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. या परीक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले. त्यांनी केवळ यूपीएससी पास केली नाही तर आयपीएस अधिकारीही बनले.

बजरंग यादव हे उत्तर प्रदेशातील बस्ती येथील धोभाट गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बस्ती येथील बहादूरपूर येथे झाले. त्यांनी २०१४ मध्ये १०वी उत्तीर्ण केली असून २०१६ मध्ये १२वी उत्तीर्ण केली. तसेच बजरंग यांनी प्रयागराज विद्यापीठातून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेतले, ज्यामध्ये ते अव्वल ठरले. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
Gyanranjan Education Project Workshop, Webinar ,
संस्थाचालकांनो, ६ जानेवारी लक्षात ठेवा आणि सहभागी व्हा
youth from Yewati village in Lonar taluka died during treatment in Palghar Buldhana news
बुलढाणा: सासुरवाडीला गेला अन अनर्थ झाला! केवळ मोबाईलसाठी…
tenants in mhada colony will get permanent homes in nirmal nagar
निर्मलनगरमधील संक्रमण शिबिरार्थींच्या लढ्याला यश; मुळ भाडेकरुंना मिळणार निर्मलनगरमध्येच कायमस्वरुपी घरे

परीक्षेआधी झाली वडिलांची हत्या (Success Story)

बजरंग यादव यांचे वडील शेतकरी होते. बजरंग यांनी अधिकारी व्हावे अशी त्यांच्या वडिलांची नेहमीच इच्छा होती. वडिलांच्या इच्छेसाठी बजरंगने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. २०१९ च्या परीक्षेच्या तयारीसाठी बजरंग दिल्लीला गेले होते. त्याचवेळी बजरंग यांच्या वडिलांनी नेहमीप्रमाणे अनेक गरीब-गरजू लोकांना मदत केली म्हणून काही गुंडांनी त्यांची हत्या केली. बजरंग पहिल्या परीक्षेसाठी तयारी करणार असताना त्यांच्या वडिलांचा खून झाला. त्यानंतर बजरंग हे खूप खचून गेले. वडिलांच्या निधनाच्या धक्क्यातून बजरंग यांना बाहेर यायला खूप वेळ लागला. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रोत्साहन दिले आणि यानंतर त्यांनी पुन्हा एकदा परीक्षेची तयारी सुरू केली.

हेही वाचा: Success Story: परिस्थिती बदलणे शक्य! ५० रुपयांची कमाई ते चार लाख कोटींच्या व्यवसायाच्या नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

UPSC परीक्षेत मिळवला ४५४ वा क्रमांक

पहिल्या दोन परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर बजरंग सातत्याने प्रयत्न करत राहिले. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात ते नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झाले, शिवाय परीक्षेत त्यांनी ४५४ वा क्रमांक मिळवला. बजरंग यांनी एका मुलाखतीत सांगितले की, त्यांना आयएएस अधिकारी बनून गरीब आणि असहाय लोकांना मदत करायची आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना समजले की, केवळ एक मजबूत अधिकारीच गरीब व्यक्तीला मदत करू शकतो.

Story img Loader