Success Story: भारतात असे अनेक शेतकरी आहेत, जे शेतीच्या आधुनिक आणि वेगळ्या पद्धतीमुळे लाखो रुपये कमावतात. यासाठी मेहनत, जिद्द आणि संयमही तितकाच महत्त्वाचा असतो. आज आम्ही अशाच एका यशस्वी शेतकऱ्याचा प्रवास सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बनाना मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केरळचे विनोद सहदेवन नायर यांचा शेतीचा यशस्वी प्रवास खूप प्रेरणादायी आहे. केळीच्या ५०० हून अधिक जातींची लागवड करून त्यांनी अनेकांसाठी उत्तम उदाहरण तयार केले आहे. त्यांच्या या शेतीतून ते लाखो रुपये कमावतात. केळीच्या विविध जातींबद्दल जनजागृती करण्यासाठी ते केळ्यांचे मोफत वाटपदेखील करतात. त्यांची ही बाग पाहण्यासाठी केरळमध्ये अनेक लोक भेट देतात.

आईच्या निधनानंतर शेती करण्याचा निर्णय

विनोद सहदेवन नायर हे तिरुवनंतपुरमचे रहिवासी आहेत. त्यांनी भौतिकशास्त्रात बीएससी केल्यानंतर काही काळ नोकरी केली. नंतर कोची येथे वेब डिझायनिंग कंपनी सुरू केली. मात्र, आईच्या निधनानंतर ते घरी परत येऊन आपल्या कुटुंबाची शेती करण्यासाठी गावीच राहिले. यावेळी विनोद यांना वेगळ्या प्रकारची शेती करायची होती.

५०० हून अधिक जातीची केळी मिळवली

केरळमध्ये न दिसणाऱ्या केळीच्या जाती त्यांनी गोळा करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. विविध जाती गोळा करण्यासाठी ते गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बंगाल, ओडिशा, आसाम आणि मणिपूर या राज्यांमध्ये गेले. त्यांनी विविध फलोत्पादन विभाग, संशोधन संस्था आणि विद्यापीठांशी संपर्क साधला. सध्या विनोद यांच्या शेतात केळीच्या ५०० जाती आहेत. यामध्ये लेडीज फिंगर केळी, रेड केळी आणि ब्लू जावा या आंतरराष्ट्रीय जातींचाही समावेश आहे.

हेही वाचा: Success Story : ॲपलमधील नोकरी सोडून सुरू केला स्वतःचा व्यवसाय; मेहनतीच्या जोरावर उभी केली ९००० करोडची कंपनी

परदेशातील केळीच्या जाती मिळवल्या

विनोद सहदेवन यांनी मलेशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, हवाई आणि होंडुरास यांसारख्या देशांमध्येही प्रवास केला आणि अनेक दुर्मीळ किनारी हवामानातील केळीच्या जाती मिळवल्या. विनोद ही केळी घाऊक बाजारात विकतात आणि यातून दरमहा एक लाखांहून अधिक कमावतात. तसेच ते फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांना याबाबत माहितीदेखील देतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story banana man cultivation of more than 500 varieties of banana earn lakhs of rupees per month sap