Success Story: आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जगत असते, पण प्रत्येक व्यक्ती स्वप्न पूर्ण करेलच असं नाही. काही जण अथक प्रयत्न करून जिद्दीनं आपलं स्वप्न साकारण्यात यशस्वी होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय, परिस्थिती पाहिली जात नाही. अनेकांना आयुष्यात खूप उशिरा यश मिळते, पण काही लोक असेदेखील असतात ज्यांना लहानपणापासूनच आपले स्वप्न साकारण्याची संधी मिळते. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांनी लहान वयापासूनच उत्तुंग कामगिरी केलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. रोमन सैनी, एक डॉक्टर, माजी आयएएस अधिकारी आणि एक श्रीमंत उद्योजक आहेत. रोमनने वयाच्या १६ व्या वर्षी, एम्सची परीक्षा उत्तीर्ण केली, जी सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. त्यानंतर त्यांनी २१ व्या वर्षी एमबीबीएसची पदवी मिळवली. डॉक्टर बनल्यानंतर अवघ्या वर्षभरातच सैनी यांनी बाजी मारली. त्यानंतर त्यांना यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करण्याची इच्छा होती. त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली व ते सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक बनले व मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले होते.

मात्र, ते आयएएस अधिकारी म्हणून फार काळ टिकले नाहीत. त्यांनी काही दिवसांतच त्यांच्या या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा मित्र गौरव मुंजाल आणि हेमेश सिंग यांच्यासोबत २०१५ मध्ये Unacademy ची सह-स्थापना केली. ही सेवा सध्या हजारो यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आयएएस अधिकारी बनण्यासाठी मदत करते. हे प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना कमी खर्चात यूपीएससी कोचिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी सक्षम करते.

हेही वाचा: Success Story: आठवीपर्यंत शिक्षण अन् उभी केली १३ हजार कोटींची कंपनी; जाणून घ्या सुप्रसिद्ध ‘बिकाजी’ ब्रँडच्या संस्थापकाची यशोगाथा

गौरव मुंजाल यांनी २०१० मध्ये एक लहान यूट्यूब चॅनेल म्हणून Unacademy सुरू केली होती. मात्र, त्यानंतर मुंजाल, रोमन सैनी आणि त्यांचे तिसरे सह-संस्थापक हेमेश सिंग यांनी औपचारिकपणे २०१५ मध्ये व्यवसाय सुरू केला.

Unacademy चे सीइओ म्हणून गौरव मुंजाल यांना १.५८ कोटी रुपये, हेमेश सिंग यांना १.१९ कोटी रुपये आणि रोमन सैनी यांना २०२२ मध्ये ८८ लाख रुपये मिळाले. एका अवहालानुसार, त्यांचा हा व्यवसाय अंदाजे १५,००० कोटी रुपयांचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story cleared aiims at 16 became an ias officer at 22 but left the job and founded unacademy sap