Success Story Of Cyrus Poonawalla : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) संस्थापक व पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सायरस पूनावाला एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या वतीने अविकसित देशांमध्ये पोलिओ लस अल्प किमतीत पुरवली जाते. त्यांच्या कंपनीने स्वाइन फ्लू, धनुर्वात, कावीळ रोगांना प्रतिबंध करणार्‍या दहा लसींचे उत्पादन केले आहे. तर कसा होता डॉक्टर सायरस पूनावाला यांचा प्रवास (Success Story )? सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? हे आपण जाणून घेऊ…

कोण आहेत डॉक्टर सायरस पूनावाला?

फोर्ब्स २०२४ च्या श्रीमंतांच्या यादीत सायरस पूनावाला हे सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांची सध्याची संपत्ती १,९३,७७३ कोटी रुपये आहे. १९९६ मध्ये त्यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. लस निर्मितीत त्यांची कंपनी देशात अग्रणी आहे. त्यांची सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनी दरवर्षी सुमारे १.५ अब्ज लस तयार करते. तसेच हे डोस गोवर, पोलिओ आणि फ्लूपासून संरक्षण करतात. पुण्यातील रिट्झ हॉटेल आणि मालदीवच्या बलगारी हॉटेलमध्ये त्यांचीच गुंतवणूक आहे.

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Success Story of Inder Jaisinghani
Success Story Of Inder Jaisinghani: शून्यातून घडविले विश्‍व! चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत… वाचा इंदर जयसिंघानी यांची गोष्ट
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट

हेही वाचा…Success Story : वडिलांच्या निधनामुळे सोडलं आयएएस पद; ३० खाटा टाकून सुरू केली आरोग्य सेवा; वाचा अझीम यांची यशोगाथा

तर फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार डॉक्टर सायरस पूनावाला घोडा पाळणाऱ्यांचा मुलगा आहे. सोली पूनावाला हे त्यांच्या घोडेपालन करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. तसेच २०१० मध्ये त्यांची आई विल्लू पूनावाला यांचे निधन झाले. सायरस पूनावाला यांनी पुणे विद्यापीठातून बॅचलर पदवी, पीएचडीही केली होती. युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून त्यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. सायरस पूनावाला आंतरराष्ट्रीय फॅशन आयकॉन आणि त्यांची सून उद्योगपती नताशा पूनावाला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास, वंचित कुटुंबातील बालकांना कमीत कमी किमतीत उच्च प्रतीच्या, प्रत्येक आजारावरील उपायकारक लस उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे डॉक्टर सायरस पूनावाला यांचे मत आहे. कमी किमतीत उच्च प्रतीच्या लसी उपलब्ध करून देणार्‍या त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते डी.लिट. पदवी प्रदान करण्यात आली होती. तर असा आहे डॉक्टर सायरस पूनावाला यांचा एकंदरीत प्रवास (Success Story)…