Success Story: आपल्या जिद्दीच्या जोरावर स्वप्न साकारण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. राजस्थानमधील देशल दान रतनू यांनीदेखील हेच केले. एकेकाळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप वाईट होती. त्यांचे वडील चहाची टपरी चालवायचे. त्यामुळे चांगले शिक्षण घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. पण, देशल दान रतनू यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. गरिबीची परिस्थिती असूनही शिक्षणाची ओढ असणाऱ्यांसाठी त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
राजस्थानातील एका खेड्यात चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीचा सामान्य मुलगा आज देशाचा अधिकारी आहे. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या देशल यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत होते. घरात दोन वेळचं जेवणही अनेकदा मिळत नव्हते. अशा अनेक प्रसंगांतून देशल यांनी स्वतःला मजबूत बनवलं. त्यांनी आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर हे स्थान मिळवलं.
पहिल्याच प्रयत्नात ८२ वा क्रमांक मिळवला
देशल यांचे वडील चहाचं छोटं दुकान चालवायचे. देशल यांना एकूण सात भाऊ व बहिणी आहेत. गरीब परिस्थिती आणि मोठं कुटुंब असल्यामुळे देशल यांच्याकडे चांगलं शिक्षण घेण्यासाठी घरात पुरेसे पैसे नव्हते. पण, त्यांनी अभ्यास मेहनतीनं सुरू ठेवला. ते प्रत्येक वर्गात अव्वल गुण मिळवायचे. त्याशिवाय त्यांनी आयआयआयटी जबलपूरमध्ये प्रवेश मिळाला. जिथून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करण्याबरोबर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. कोचिंगसाठी पैसे नसल्यामुळे त्यांनी स्वतः अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासह ८२ वा क्रमांक मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं.
हेही वाचा: IAS Success Story: खेडेगावातील तरुण हिंदी भाषेच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात झाला IAS अधिकारी
मोठ्या भावाकडून प्रेरणा
देशल यांचा मोठा भाऊ भारतीय नौदलात होता. देशल त्यांना आपलं प्रेरणास्थान मानतात. त्यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ २०१० मध्ये हुतात्मा झाला होता. त्यांच्या मोठ्या भावालाही अधिकारी व्हायची इच्छा होती.
© IE Online Media Services (P) Ltd