Success Story: राकेश चोपदार यांनी त्यांच्या प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशदायी प्रवास केला आहे. एकेकाळी राकेश यांना अनेकांचे टोमणे ऐकावे लागायचे. राकेश दहावीच्या परीक्षेत नापास झाले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांकडून अनेकदा अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या; मात्र ते खचले नाहीत. दहावीनंतर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कारखान्यात, ‘ॲटलस फास्टनर्स’मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी इंजिनियरिंग आणि उत्पादनातील कौशल्ये वाढवली. अनेक अडचणी असूनही त्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून स्वत:ला विकसित केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ वर्षांच्या मेहनतीनंतर नवीन सुरुवात

जवळपास १२ वर्षे वडिलांच्या कारखान्यात काम केल्यानंतर राकेश यांनी २००८ मध्ये आझाद इंजिनियरिंग या स्वतःच्या नव्या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी त्यांनी बालानगरमध्ये २०० स्क्वेअर मीटरच्या शेडमध्ये सेकंड-हॅण्ड सीएनसी मशीनसह सुरुवात केली आणि युरोपियन कंपनीसाठी थर्मल पॉवर टर्बाइन एअरफोइल बनवण्यासाठी हजारो डॉलर्सची ऑर्डर त्यांना मिळाली. सुरुवातीला थर्मल पॉवरने सुरुवात केली आणि नंतर आण्विक, वायू आणि हायड्रोजन टर्बाइनचे उत्पादन बनविण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला जागतिक OEMs ला विश्वास नव्हता की, एक भारतीय कंपनी इतके चांगले 3D फिरणारे पार्ट्स बनवू शकते; पण राकेश यांच्या आझाद इंजिनियरिंगने स्पर्धात्मक किमतीत जागतिक दर्जाची उत्पादने देऊन आपली क्षमता सिद्ध केली. सध्या ते भारतातील एकमेव असे उद्योजक आहेत, जे या श्रेणीमध्ये काम करतात.

सध्या राकेश यांची आझाद इंजिनियरिंग उद्योगातील एक प्रमुख प्लेअर म्हणून उभी आहे, जी पॉवर सेक्टर, लष्करी विमाने आणि तेल व वायू उद्योगांमध्ये ही कंपनीने जागतिक स्पर्धा करते आणि रोल्स-रॉइस, बोईंग, सफारान, जीई, मित्सुबिशी, सीमेन्स, बेकर ह्यूजेस, प्रॅट अॅण्ड व्हिटनी, डूसन, हनीवेल व तोशिबा यांसारख्या प्रख्यात मूळ उपकरण निर्मात्यांसोबत (OEMs) धोरणात्मक भागीदारी स्थापन केली आहे.

हेही वाचा: Success Story: नोकरी सोडून स्वतःच्या गावात सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय; महिन्याला कमावतात लाखो रुपये

३५० कोटींची उभी केली कंपनी

राकेशच्या कंपनीने २००८ मधील दोन कोटींवरून २०२३-२०२४ मध्ये ३५० कोटींची कमाई केली आहे. ही कंपनी आता सुमारे १,२०० लोकांना रोजगार देत असून आझाद इंजिनियरिंग टुनिकी बोलाराम व जिन्नाराम येथे २,००,००० चौरस मीटरमध्ये पसरलेल्या ८०० कोटींच्या गुंतवणुकीसह आपला व्यवसाय वाढवीत आहे. एक विश्वासार्ह व दर्जेदार निर्माता म्हणून आपली प्रतिष्ठा निर्माण करून, आझाद इंजिनियरिंगने २०२२ मध्ये तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. राकेश चोपदार यांचा शाळा सोडल्यापासून ते यशस्वी उद्योजकापर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो.