Success Story: देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणे हे भारतीय लष्कराचे (Indian Army) प्रमुख कर्तव्य आहे. भूदल, नौदल आणि वायूदल या तीन सेनांचा समावेश भारतीय लष्करामध्ये होतो. भारतातील अनेक तरुणांचे लष्करात जाण्याचे स्वप्न असते. त्यासाठी काही जण लहानपणापासूनच खूप मेहनत घेतात. या मेहनतीच्या काळात त्यांचे कुटुंबीयही त्यांची साथ देताना दिसतात. आज आम्ही नुकत्याच लष्करात आर्मी ऑफिसर झालेल्या तरुणाचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत.

शनिवारी इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी देशसेवेची तळमळ असलेल्या अनेक सामान्य कुटुंबातील तरुणांचे स्वप्न साकार होताना दिसले. त्यापैकी एक तरुण तब्बल १२ व्या प्रयत्नात सीडीएस उत्तीर्ण होऊन तो आर्मी ऑफिसर झाला. या तरुणाचे नाव दीपक सिंग बिश्त असून तो रानीखेत, उत्तराखंडचा रहिवासी आहे.

While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Loksatta balmaifal Kashmir Tour Himalayas Natural Beauty
काश्मीरची संस्मरणीय सहल
Abhyudayanagar redevelopment plan news in marathi
अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट
Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट
The inspiring journey of Shark tank fame Vineeta Sing
Success Story: १ कोटींचा पगार नाकारून सुरू केली स्वत:ची कंपनी; आज आहे ४००० कोटींची मालकीण! कोण आहे उद्योजिका?

लष्करात लेफ्टनंट झालेला दीपक सिंग बिश्त हा मूळचा अल्मोडा जिल्ह्यातील बागवालीपोखर रानीखेतचा रहिवासी आहे. त्याचे वडील दिल्लीत ढाबा चालवतात. त्याचे सुरुवातीचे शिक्षण महातगाव येथील प्रिन्स पब्लिक स्कूलमधून झाले. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांबरोबर दिल्लीला आला आणि सूरजमल विहार येथील प्रतिभा विकास विद्यालयमधून इंटरमिजिएट पास झाला.

हेही वाचा: Success Story: परीक्षेत नापास झाले… लोकांचे टोमणे ऐकले; कठोर परिश्रम करून उभी केली तब्बल ३५० कोटींची कंपनी

सीडीएसमध्ये झाला तब्बल १० वेळा नापास

दीपक सिंग बिश्तने शिक्षणादरम्यान NCC मध्ये प्रवेश घेतला होता. इथूनच त्याने आर्मी ऑफिसर बनण्याची स्वप्ने पाहिले. तो सीडीएसमध्ये तब्बल १० वेळा नापास झाला. त्याची ११व्यांदा हवाई दलात निवड झाली, पण त्याला सैन्यात भरती होण्याचा इच्छा होती, त्यामुळे तो पुन्हा एकदा सीडीएसमध्ये रुजू झाला. शेवटी त्याची १२ व्या वेळी लष्करात निवड झाली. या ट्रेनिंग काळात दीपकने गरीब मुलांची शिकवणी घेतली होती.

मुलाला गणवेशात पाहून आई-बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले

पासिंग आऊट परेडनंतर जेव्हा दीपक सिंग बिश्त त्याची आई गीता देवी बिश्त आणि वडील राजेंद्र सिंह बिश्त यांना भेटला, तेव्हा आपल्या मुलाला गणवेशात पाहून दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले होते.

Story img Loader