Success story: करोना काळापासून अनेक भारतीय शहरातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. शेती करण्यासाठी नोकरीच्या तुलनेत अधिक कष्ट करावे लागले तरीही त्यातून मिळणारा मोबदला आणि समाधान जास्त पाहायला मिळते. शिवाय आजकाल अनेक जण आधुनिक पद्धतीची शेती करताना दिसतात. गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील शेतकरीही नैसर्गिक शेतीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. येथील शेतकरी विविध मॉडेल्स विकसित करून पाच टप्प्यातील बागायती पिके घेत आहेत. अमरापूर गावात एकेकाळी आंबा लागवड अशक्य मानली जात होती, पण एका शेतकऱ्याने हे करून दाखवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

३८ वर्षांच्या घनश्याम यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर शेतीचा व्यवसाय सोडून १५ वर्षे कीटकनाशक औषधांचा व्यापार केला. यातून त्यांना वर्षाला २५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत होते, मात्र कीटकनाशकांमुळे होणारी पर्यावरण आणि आरोग्याची हानी पाहून त्यांनी हा व्यवसाय सोडून त्यांनी नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले.

१० वर्ष करत होते मेहनत

मागील दहा वर्षांपासून नैसर्गिक शेती करणाऱ्या घनश्याम यांनी एक मॉडेल फार्म तयार केले, ज्यामध्ये आंबा, सपोटा, डाळिंब, जामफळ, काजू या फळांच्या लागवडीबरोबरच वांगी, करवंद, घोसाळं, मिरची या भाज्यांचीही लागवड केली जाते. यातून वर्षभर उत्पन्न मिळते. अमरापूर, वाडिया, कुकावाव हे क्षेत्र कोरडे मानले जाते; ज्यांना फूल कराल क्षेत्र म्हणतात. या भागात आंबा लागवड करता येत नाही, पण योग्य मार्गाने प्रयत्न केले तर अशक्यही शक्य होऊ शकते, असा निर्धार करून त्यांनी ही गोष्ट पूर्ण करून दाखवली.

गावकऱ्यांनी वेड्यात काढलं

जेव्हा घनश्याम यांनी आंब्याची शेती सुरू केली तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. परंतु, चार वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांचे पीक फुलले आणि त्यांच्या यशाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्यानंतर त्यांच्या गावात हळूहळू लोक आंबा लागवडी करू लागले. घनश्याम यांच्यापासून प्रेरणा घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांनी जवळपास ३००० हून अधिक आंब्याची रोपटी लावली, ज्यामुळे गावातील शेतीचे स्वरूप बदलले.

२० बिघामध्ये नैसर्गिक शेतीचा चमत्कार

घनश्याम यांनी २० बिघा जमिनीत भुईमूग, हरभरा, धणे आणि तूर ही पिके घेतली. ही पिके त्यांनी बाजारात चांगल्या भावात विकून २५ लाखांहून अधिक कमाई केली.