Success Story: हल्ली अनेक तरुण व्यावसायिक परदेशात शिक्षण घेण्याची आणि मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याची इच्छा बाळगतात. तर काही जण वेगळ्या पद्धतीने यश मिळवण्यासाठी वेगळा मार्ग निवडतात. भोपाळचा २२ वर्षीय हर्षित गोधा हा असाच एक तरुण आहे, ज्याने परदेशातील कॉर्पोरेट करिअर सोडून शेतीमध्ये पाऊल ठेवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लंडनमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवी पूर्ण केल्यानंतर हर्षितने नोकरीऐवजी इस्रायलमध्ये विशेष कृषी प्रशिक्षण घेतले. लंडनमध्ये असताना इस्रायली अॅव्होकॅडोशी झालेल्या साध्या भेटीमुळे प्रेरित होऊन, उच्च मूल्ये असलेल्या पिकांची लागवड करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रगत शेती तंत्रांनी त्याला आकर्षित केले. ही कौशल्ये भारतात आणण्याचा दृढनिश्चय करून, त्याने शाश्वत आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या शेती पद्धतींवर लक्ष केंद्रित करून इस्रायलमध्ये सखोल प्रशिक्षण घेतले.

भारतात येऊन अॅव्होकॅडोची लागवड करण्याचा निश्चय

२०१९ मध्ये हर्षितने भोपाळमध्ये इंडो-इस्रायल अ‍ॅव्होकॅडो हा कृषी उपक्रम सुरू केला. पाच एकर जमीन आणि १,८०० अ‍ॅव्होकॅडो झाडांपासून सुरुवात करून, त्याने इस्रायली तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती तंत्रांचा वापर करून एक व्यवसाय उभारला. त्याच्या या प्रवासात त्याने खूप मेहनत केली. अनेक समस्यांचा सामना केला. कोविड-१९ साथीच्या काळातही त्याला खूप कष्ट घ्यावे लागले. या काळात अ‍ॅव्होकॅडो रोपे आयात करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला. परंतु, २०२१ पर्यंत त्याने २०,००० रोपे यशस्वीरीत्या आयात केली आणि मोठ्या प्रमाणात लागवडीचा पाया रचला.

महिन्याला एक कोटीचे उत्पन्न

हर्षित अॅव्होकॅडो शेती आणि रोपांच्या विक्रीतून दरवर्षी एक कोटीपेक्षा जास्त कमाई करतो. त्याचे यश वैयक्तिक कामगिरीपेक्षाही जास्त आहे. कारण- तो आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश व सिक्कीममधील शेतकऱ्यांना अॅव्होकॅडो रोपे पुरवतो. तो ब्लॉग, ई-बुक आणि इच्छुक शेतकऱ्यांना शिक्षित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या YouTube चॅनेलद्वारे त्याची माहिती शेअर करून मोफत मार्गदर्शनदेखील करतो.