Success Story: जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्नपूर्तीसाठीच जगते. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न वेगवेगळे असते. कोणाला पोलिस व्हायचे असते, तर कोणाला व्यावसायिक. स्वप्न खरे करण्यासाठी अनेक जण दिवस-रात्र अतोनात प्रयत्न करीत असतात. पण, या प्रयत्नांना अनेकदा हवं तसं यश मिळत नाही. त्यामुळे काही जण खचून जातात आणि ते स्वप्नपूर्तीसाठी चालत असलेली वाट अर्धवट सोडून देतात; तर काही जण मिळालेल्या थोड्याशा यशातही समाधानी राहतात. पण, असेदेखील काही लोक असतात; जे संकटाला तोंड देऊन आणि आपल्या परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करतात. आज आम्ही अशाच एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत; जे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, आता अब्जाधीश आहेत.

शशी किरण शेट्टी हे खूप प्रसिद्ध उद्योजक असून, त्यांनी वयाच्या २९ व्या वर्षी २५ हजार रुपयांची गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. त्याच व्यवसायाचे रूपांतर आता तब्बल तेरा हजार कोटी रुपयांत झाले आहे.

नोकरीच्या शोधासाठी मुंबईत

कर्नाटकामध्ये जन्मलेल्या शशी किरण शेट्टी यांचा जन्म ७ जून १९५७ रोजी झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी श्री वेंकटरामन स्वामी महाविद्यालयातून कॉमर्समधून शिक्षण घेतले. १९७८ मध्ये नोकरी मिळविण्यासाठी मुंबईत आले. शशी किरण शेट्टी यांनी वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून व्यवसाय सुरू केला. आज त्यांची कंपनी ऑलकार्गो ग्रुप ही जगातील सर्वांत मोठी LCL कंसोलिडेटर आहे. या कंपनीची किंमत सध्या तब्बल सुमारे तेरा हजार कोटी आहे.

हेही वाचा: Success Story : भाजी विकून चालवलं कुटुंब, नापास होऊनही मानली नाही हार; मेहनतीच्या जोरावर मिळवलं आरएएस परीक्षेत यश

असा सुरू झाला यशाचा प्रवास

शशी किरण शेट्टी मुंबईत आल्यानंतर इंटरमॉडल ट्रान्स्पोर्ट अॅण्ड ट्रेडिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘फोर्ब्स गोकाक’मध्ये काम केले. तसेच त्यांनी मेहनतीच्या जोरावर वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी ट्रान्स इंडिया फ्रेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाचा व्यवसाय सुरू केला. १९९४ मध्ये त्यांनी ऑलकार्गो ग्रुप ही कंपनी सुरू केली. आज ‘ऑलकार्गो ग्रुप’ची १८० देशांमध्ये ४,५०० हून अधिक कर्मचारी आणि कार्यालये आहेत. ही कंपनी जगातील सर्वांत मोठी LCL कंसोलिडेटर आहे.