Jagpal Singh Phogat Success Story: हरियाणातील जगपाल सिंग फोगट यांनी कुटुंबीयांच्या विरोधात शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडून मधमाशीपालन सुरू केले. आपल्या मेहनतीने आणि युक्तीने जगपाल सिंग फोगट यांनी दोन कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण केला. सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींनंतरही जगपाल यांनी एका महिन्यात २५ डब्बे मधाने भरले. यावरून त्यांच्या कुटुंबीयांना या व्यवसायाची क्षमता लक्षात आली. २००७ मध्ये त्यांनी पूर्णपणे मधमाशीपालन सुरू केले. आता तो वेगवेगळी उत्पादने विकून चांगला नफा कमवत आहे.
२००१ मध्ये सुरू केला व्यवसाय
मधमाशीपालन सुरू करण्यापूर्वी जगपाल सिंग फोगट शाळेत शिक्षक होते. २००१ मध्ये हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील एका गावात त्यांनी मधमाशीपालनाला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबीयांनी मधमाशीपालन करण्याच्या त्यांच्या निर्णयाला विरोध केला. त्यांच्या व्यवसायाला विरोध करत त्यांचे वडील त्यांना म्हणाले होते की, ‘अरे मास्तर, गाय ठेवा, म्हैस ठेवा, बकरी ठेवा, कोंबडी ठेवा, पण मधमाशी? ती तर उडून जाईल.’
खरं तर २००१ मध्ये जगपाल सिंग फोगट यांच्या गावात मधमाशी पालन ही एक नवीन कल्पना होती. अनेकांनी जगपाल यांची खिल्ली उडवली. पण, या व्यवसायाचे बदलते रूप पाहून त्यांचे मत बदलले. पहिल्याच महिन्यात २५ टिन मध विकून त्यांनी चांगली कमाई केली. प्रत्येक टिन दोन हजार रुपयांना विकले गेले. हे त्यांच्या कुटुंबाच्या गव्हाच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खूप जास्त होते. या यशामुळे त्यांना मधमाशीपालनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
२००७ मध्ये जगपाल यांनी मधमाशीपालनामध्ये स्वतःला पूर्णपणे वाहून घेण्यासाठी आपली शिक्षकाची नोकरी सोडली. शेती करणाऱ्या जगपाल यांना मधमाशीपालनामुळे पारंपरिक शेती पद्धतींपेक्षा कितीतरी अधिक फायदे मिळतात. मधमाशी पालनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जगपाल यांनी लुधियाना मधमाशीपालकांना भेटायला सुरुवात केली. त्यांनी दिल्लीतील एका शेतकऱ्याकडून ६०,००० रुपये गुंतवून २,००० रुपये प्रति पेटी या दराने ३० मधमाश्यांच्या पेट्या विकत घेतल्या. कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय तो इतर शेतकऱ्यांकडून शिकण्यावर आणि स्वतःच्या व्यावहारिक अनुभवावर अवलंबून राहिला. सुरुवातीला त्याला अपयशाचा सामना करावा लागला, पण हार न मानता प्रयत्न करत राहिले.
हेही वाचा: Success Story : दरमहा ४०० रुपये पगाराच्या नोकरीपासून ते दोन हजार कोटींचा व्य
५०० हून अधिक शेतकऱ्यांना दिले प्रशिक्षण
जगपाल यांनी हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढवला. २०१६ मध्ये त्यांनी प्रोसेसिंग युनिटही स्थापन केले. या युनिटमध्ये मेणबत्त्या, साबण, परागकण आणि रॉयल जेली अशी अनेक उत्पादने बनवली जातात. ते ‘नेचर फ्रेश’ आणि ‘बी बझ’ या ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने विकतात. गेल्या वर्षी त्यांच्या कंपनीचा महसूल दोन कोटी रुपये होता. जगपाल केवळ आपला व्यवसायच वाढवत नाही, तर इतरांनाही मदत करत आहेत. आतापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले आहे.