Jaynti Kanani Success Story : मेहनत करणाऱ्यांना देव नेहमीच साथ देतो, असे अनेकदा म्हटले जाते. पण, यशस्वी होण्यासाठी आधी मोठी स्वप्ने पाहणे महत्त्वाचे असते. तसेच ती पूर्ण करताना आलेली कोणतीही मोठी संकटेही परिश्रम करीत बाजूला सारून स्वत:ला सिद्ध करावे लागते. अनेकदा स्वत:ची स्वप्ने पूर्ण करताना घरच्यांची मदत मिळते; तर काही वेळी मित्र देवासारखे धावत येऊन तुम्हाला मदत करतात. गुजरातमधील जयंती कनानी या तरुण उद्योजकाची यशोगाथा ही काहीशी अशाच प्रकारची आहे.

गरिबीत राहूनही मोठी उंची गाठणे शक्य असते हे सिद्ध त्यांनी केले. एका सामान्य कुटुंबात राहून आणि कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन जयंती कानानी यांनी एक विलक्षण प्रवास केला. जयंती यांची आर्थिक स्थिती एकेकाळी खूपच कमकुवत होती. त्यात एक काळ असा आला की, त्यांच्याकडे शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. त्यांनी शिक्षण कसेबसे पूर्ण केले, सहा हजार रुपये पगारावर काम केले. लग्नासाठी कर्ज घेतले; पण आजच्या घडीला ते हजारो कोटींच्या कंपनीचे मालक आहेत. (Polygon Cofounder Jaynti Kanani)

४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kinetic Group president Arun Firodia Hinjewadi
हिंजवडी ‘आयटी पार्क’बाबत उद्योजक अरुण फिरोदिया यांची महत्वाची सूचना, म्हणाले…
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
AICTE Scholarship for Engineering Students
अरे वाह! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५० हजार; काय आहे योजना?
second phase of action against unauthorized buildings at Agrawal Nagar in Nalasopara also underway on Monday
नालासोपार्‍यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई, स्थानिकांच्या रोषाचा खासदार, आमदारांना फटका
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य

गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी जयंती कनानी हे अतिशय गरीब कुटुंबात वाढले. त्यांचे कुटुंब अहमदाबादच्या बाहेरील एका छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. जयंती यांचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात काम करायचे. मग अशा परिस्थितीतही जयंती कनानी (Success Story) यांनी एवढे मोठे यश कसे मिळवले ते जाणून घेऊ…

जयंती कनानी यांचा जीवनप्रवास ( Jaynti Kanani Success Story)

जयंती कनानी यांचे बालपण अहमदाबादबाहेरील एका छोट्या फ्लॅटमध्ये गेले. जयंती यांचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परंतु, त्या परिस्थितीतही वडिलांनी आपल्या मुलाला मोलमजुरी करून शिकवले. एक वेळ तर परिस्थिती अशी आली की, त्यांच्याकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. जयंती स्वतःला नशीबवान मानतात की, त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले. त्यांच्या आयुष्याचा एकच उद्देश होता की, आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढायचे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयंती कनानी यांनी नडियाद येथील धरमसिंह देसाई विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना पुण्यात मासिक सहा हजार रुपये पगारावर नोकरी लागली.

या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण असल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी ते नोकरीनंतरही घरूनच काही प्रोजेक्ट्सवर काम करायचे. पार्ट टाईम कमाई करूनही जयंती कनानी फारसे पैसे कमवू शकले नाहीत.

अशा परिस्थितीत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मग लग्नासाठी त्यांना कर्जही घ्यावे लागले होते. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जयंती यांच्या मनात बिलियन डॉलर्सची कंपनी उभारण्याचा विचार कधीच आला नव्हता. जयंती कनानी एका कंपनीत डेटा विश्लेषक म्हणून काम करीत असताना त्यांची ओळख संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्याशी झाली. त्यांच्याशी झालेली ही ओळखच जयंती यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. तिघांचेही उद्दिष्ट पैसे कमावणे हे होते आणि त्यासाठी त्यांना काहीतरी मोठे करायचे होते.

यादरम्यान तिघांनी मिळून २०१७ मध्ये Polygon नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला कंपनीचे नाव मॅटिक, असे होते. कंपनीने अवघ्या सहा वर्षांत प्रचंड यश (Success) मिळवले. डीएनए अहवालानुसार, कंपनीचे सध्याचे मूल्य ५५,००० कोटी रुपये आहे. ‘पॉलीगॉन’ला प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार व शार्क टँकचे जज मार्क क्युबन यांच्याकडूनही फंडिंग मिळाले. २०२२ मध्ये ‘पॉलीगॉन’ने सॉफ्ट बँक, टायगर ग्लोबल व सेकोइया कॅपिटल इंडिया यांसारख्या गुंतवणूकदारांमार्फत $450 दशलक्ष इतका निधी उभारला. आज ही कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

Story img Loader