Success Story: आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय, पैसा, धर्म अशी कोणतीही अट नसते. स्वप्न साकारण्यासाठी फक्त आपली मेहनत आणि चिकाटी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आपल्या भारतात असे अनेक दिग्गज आहेत की, ज्यांनी अनेक अडचणींवर मात करीत स्वतःचे स्वप्न साकारले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यावसायिकाच्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी केवळ १०,००० रुपयांचे कर्ज घेऊन १,१५० कोटी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केले आहे.

कमल खुशलानी असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याचा मुफ्ती ब्रँड आज भारतीय फॅशन जगतात एक प्रसिद्ध झाला आहे. १९९८ मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास बाईकवर कपडे विकण्यापासून ते करोडोंच्या व्यवसायापर्यंत गेला आहे.

Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Success Story Of Krishna Arora In Marathi
Success Story: कोण आहे कृष्णा अरोरा? ज्याने २५ व्या वर्षी खरेदी केली स्वतःची करोडोंची कार; वाचा, ‘त्याची’ गोष्ट
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
Manjit Singh Success Story
Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय

कमल खुशलानी यांचे बालपण

कमल खुशलानी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता, ते १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कमल यांच्यावर पडली. आर्थिक मदत करण्यासाठी कमल यांनी एका कॅसेट कंपनीत काम करायला सुरुवात केली. आयुष्यातील या अडचणी असूनही कमल यांना फॅशनची आवड होती. त्यांचे मित्र आणि नातेवाईक नेहमी त्यांच्याकडून कपडे आणि स्टाईलबद्दल सल्ला मागायचे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.

१९९२ मध्ये कमलने आपल्या मावशीकडून १०,००० रुपये उसने घेऊन पहिला व्यवसाय सुरू केला. ती शर्ट बनवणारी कंपनी होती. त्याचे नाव Mr & Mr हे होतं. त्यांच्या घरापासून ते ऑफिस आणि वेअरहाऊस, कमल डिझायनिंगपासून उत्पादन आणि विक्रीपर्यंत सर्व काही स्वतः सांभाळायचे. पण, कमलला काहीतरी मोठं करायचं होतं. १९९८ मध्ये त्यांनी मुफ्ती ब्रँड लाँच केला, यामुळे भारतीय पुरुषांची फॅशन आणखी बदलली. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. कोणतेही कार्यालय किंवा कर्मचारी नसताना कमल आपल्या दुचाकीवर कपडे सूटकेसमध्ये भरून दुकानदारांना विकायचे.

हेही वाचा: Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी

देशात मुफ्ती ब्रँड झाला लोकप्रिय

२००० च्या दशकाच्या सुरुवातीला मुफ्तीच्या ब्रँडने पुरुषांसाठी स्ट्रेच जीन्स आणली. भारतीय बाजारपेठेत ही एक नवीन कल्पना होती. ही स्टाईल ग्राहकांना खूप आवडली आणि यामुळे मुफ्ती प्रसिद्ध झाले, त्यामुळे त्यांच्या ब्रँडचा विस्तार झाला. कमल खुशलानी यांनी मुफ्तीचे खास ब्रँड आउटलेट उघडले. आज मुफ्ती यांचे देशभरात ३७९ विशेष ब्रँड स्टोअर्स, ८९ मोठ्या फॉरमॅट स्टोअर्स आणि १,३०५ मल्टी-ब्रँड आउटलेट आहेत. या संपूर्ण यशाच्या प्रवासात कमल यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, ते त्यांच्या दृष्टीवर ठाम राहिले आणि त्यांनी यश प्रस्थापित केले.

Story img Loader