Success Story: परिस्थिती बदलण्यासाठी चांगल्या विचारांसह मेहनत करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, तेव्हाच आपल्या कष्टाचे योग्य फळ मिळते. भारतात प्रत्येक वर्षी स्पर्धा परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी अभ्यास करतात. पण, त्यातील मोजके विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तार्ण होतात. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, ज्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य प्रदेशच्या ग्रामीण भागात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संतोष पटेल यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकेकाळी ते आणि त्यांचे कुटुंबीय एका पडक्या झोपडीत राहायचे आणि मूलभूत गरजांसाठी संघर्ष करायचे. परंतु, शिक्षण आणि मेहनतीने त्यांना एका खडतर परिस्थितीतून उपविभागीय अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवून आणण्यास मदत केली. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेली कामगिरी अनेकांना प्रेरणादायी आहे.

संतोष पटेल यांचे खडतर बालपण

संतोष आणि त्यांची भावंडं एका छोट्याशा झोपडीत राहत होते, त्यांच्या अभ्यासाचे साहित्य अनेकदा पावसाच्या पाण्यामुळे खराब व्हायचे आणि झोपडीत लाईट नसल्याने अभ्यासासाठी ते दिव्याचा वापर करायचे. दोन वेळचे जेवणही मिळणे फार कठीण होते. अनेकदा दुसऱ्यांनी दिलेले अन्न ते खायचे. अशा अनंत अडचणी असतानासुद्धा संतोष यांनी लहानपणापासूनच मनात आयुष्यात काहीतरी चांगलं आणि मोठं करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी दगड फोडण्याच्या कष्टाच्या नोकऱ्या केल्या.

बारावीनंतर संतोष पटेल यांनी आयआयटीची तयारी केली, पण त्यात अपयश आले. त्यानंतर त्यांनी भोपाळच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगचा कोर्स केला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर संतोष यांनी एम.टेकला प्रवेश घेतला. पण, पुढे त्या क्षेत्रात नोकरी न करता त्यांनी पीएससी उत्तीर्ण करण्याचा निर्धार केला आणि त्यांनी कठोर परिश्रम सुरू केले. पहिल्या प्रयत्नात ते अपयशी ठरले, पण दुसऱ्या प्रयत्नात संतोष यांना यश मिळाले. मध्य प्रदेश सरकारच्या प्लॅनेटरी विभागात पोलिस उपअधीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली. आज डीएसपी संतोष पटेल मध्य प्रदेशातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा: Success Story: बालपणीच्या मित्रांनी सुरू केला हलवा विकण्याचा व्यवसाय; एका वर्षात कमावले लाखो रुपये

आयुष्यात आर्थिक अडचणींमुळे त्यांना अनेक समस्या आल्या, तरीही त्यांच्या दृढनिश्चयामुळे त्यांनी कारकीर्द घडवून आणली. संतोष पटेल यांचा हा प्रवास त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि समाजासाठी अभिमानास्पद आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story lived in huts poor conditions and overcame many obstacles to become dsp sap