Success Story of Aadithyan Rajesh: अनेक मुलं त्यांची पॉकेट मनी वाढवण्यावर किंवा शाळेतील अभ्यासाच्या दबावावर लक्ष केंद्रित करत असताना, केरळमधील आदित्यन राजेश याने अगदी लहान वयातच एक IT उद्योजक म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दुबईमध्ये स्थित असलेला आदित्यन वेब डिझाईन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलायझेशन असलेल्या ‘Trinet Solutions’ चा संस्थापक आणि मालक आहे. त्याचा हा प्रभावशाली प्रवास अगदी तरुण वयातच सुरू झाला, आणि तो सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.

वयाच्या ९व्या वर्षी केलं ॲप लॉंच

आदित्यनला अगदी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी त्याला संगणकाची आवड निर्माण झाली होती. त्याच्या वडिलांनी बीबीसी टायपिंग वेबसाइट दाखवल्यानंतर त्याला याबाबत अधिक आकर्षण वाटले. यामुळे त्याला तंत्रज्ञानात रस निर्माण झाला आणि वयाच्या ९ व्या वर्षी आदित्यनने सहज कंटाळा दूर करण्याचा मार्ग म्हणून त्याचे पहिले मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं.

Prabhatai, Hariprasad Chaurasia, Prabhatai Atre,
संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
3 rare Raja Yogas will be created in september
‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; होणार आकस्मिक धनलाभ
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Vikas sethi passes away
Vikas Sethi Passes Away: ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेता विकास सेठीचा मृत्यू; झोपेतच आला हृदयविकाराचा झटका
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…

हेही वाचा… बिहारमधील लहानशा गावात राहणाऱ्या तरुणाला मिळाली गुगलमध्ये नोकरी अन् २ कोटींचं पॅकेज; वाचा अभिषेक कुमारचा प्रेरणादायी प्रवास

शाळेतील अभ्यास्याच्या दबावासह अनेक आव्हाने असूनही, आदित्यनने या अडथळ्यांना कधीही त्रास मानलं नाही. वयाच्या १३ व्या वर्षी, त्याने Trinet Solutions ची स्थापना केली, जेव्हा त्याच्या वयाची बहुतेक मुले त्यांच्या अभ्यासात आणि सामाजिक जीवनात व्यस्त असतात. दुबईस्थित असलेली त्याची कंपनी केवळ वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्स डिझाइन करत नाही तर ग्राहकांना विविध आयटी सोल्यूशन्सदेखील देते.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्यापलीकडे आहेत ही कौशल्ये

आदित्यनचा टॅलेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्यादेखील पलीकडे आहे. तो लोगो आणि वेबसाइट्स डिझाइन करण्यात देखील कुशल आहे. अगदी लहान वयातच कॉम्प्युटर सायन्सची सुरूवात केल्याने त्याने कधीच शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्याने आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांसह आपल्या उद्योजकीय कामांमध्ये समतोल राखला आणि हाच त्याच्या परिश्रमाचा दाखला आहे.

‘Trinet Solutions’ चालवण्याव्यतिरिक्त, आदित्यनने YouTube च्या जगातदेखील प्रवेश केला आहे. ‘अ क्रेझ’ या चॅनेलवर, तो त्याचे तंत्रज्ञान, कोडिंग, गेमिंग आणि वेब डिझाइनचे ज्ञान शेअर करत असतो. अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटचे कोर्सेस ऑफर करून आदित्यन भविष्यात त्याचे YouTube चॅनल वाढवण्याची योजना आखत आहे. त्याची धाकटी बहीणदेखील या चॅनेलसाठी व्हिडिओ फिल्मिंग करायला त्याला मदत करते.

हेही वाचा… लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा

आदित्यनची आयटी कंपनी, अद्याप अधिकृतपणे नोंदणीकृत नसली तरी, त्याच्या तीन शाळकरी मित्रांच्या मदतीने ती चालते. एकत्रितपणे, त्यांनी १२ पेक्षा जास्त क्लायंटसाठी यशस्वीरित्या प्रकल्प पूर्ण केले आहेत. जागतिक स्तरावर Trinet Solutions वाढवण्याची आणि iOS डिव्हाईसेससाठी ॲप्स विकसित करण्याची आदित्यन आकांक्षा बाळगतो. सध्या, तो त्याच्या शाळेतील शिक्षकांसाठी डिझाइन केलेल्या क्लास मॅनेजमेंट या ॲपवर काम करत आहे आणि त्याच्या वर्गमित्रांना विविध प्रकल्पांवर तांत्रिक सहाय्य पुरवतो.

आदित्यन राजेशचा ॲप डेव्हलपर ते एक यशस्वी सीईओ असा प्रवास ही यशाची आणि समर्पणाची एक उल्लेखनीय कथा आहे, जे हे दाखवून देते की कठोर परिश्रमाने लहान वयातच विलक्षण यश मिळवता येते.