Success Story of Aadithyan Rajesh: अनेक मुलं त्यांचा पॉकेट मनी वाढवण्यावर किंवा शाळेतील अभ्यासाच्या दबावावर लक्ष केंद्रित करीत असताना, केरळमधील आदित्यन राजेश याने अगदी लहान वयातच एक IT उद्योजक म्हणून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दुबईमध्ये स्थित असलेला आदित्यन वेब डिझाईन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलायझेशन असलेल्या ‘Trinet Solutions’चा संस्थापक व मालक आहे. त्याचा हा प्रभावशाली प्रवास अगदी तरुण वयातच सुरू झाला आणि तो सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वयाच्या ९व्या वर्षी केलं ॲप लॉंच

आदित्यनला अगदी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी त्याला संगणकाची आवड निर्माण झाली होती. त्याच्या वडिलांनी बीबीसी टायपिंग वेबसाइट दाखवल्यानंतर त्याला याबाबत अधिक आकर्षण वाटलं. त्यामुळे त्याला तंत्रज्ञानात रस निर्माण झाला आणि वयाच्या नवव्या वर्षी आदित्यननं सहज कंटाळा दूर करण्याचा मार्ग म्हणून त्याचं पहिलं मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलं.

हेही वाचा… बिहारमधील लहानशा गावात राहणाऱ्या तरुणाला मिळाली गुगलमध्ये नोकरी अन् २ कोटींचं पॅकेज; वाचा अभिषेक कुमारचा प्रेरणादायी प्रवास

शाळेतील अभ्यासाच्या दबावासह अनेक आव्हानं असूनही, आदित्यननं या अडथळ्यांना कधीही त्रास मानलं नाही. वयाच्या १३ व्या वर्षी त्यानं Trinet Solutions ची स्थापना केली, जेव्हा त्याच्या वयाची बहुतेक मुलं त्यांच्या अभ्यासात आणि सामाजिक जीवनात व्यग्र असल्याचं दिसतं. दुबईस्थित असलेली त्याची कंपनी केवळ वेबसाइट्स आणि ॲप्लिकेशन्स डिझाइन करीत नाही, तर ग्राहकांना विविध आयटी सोल्युशन्सदेखील देते.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्यापलीकडे आहेत ही कौशल्ये

आदित्यनचं टॅलेंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्यादेखील पलीकडे आहे. तो लोगो आणि वेबसाइट्स डिझाइन करण्यातदेखील कुशल आहे. अगदी लहान वयातच संगणक विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात केल्यानं त्यानं कधीच शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यानं आपल्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांसह आपल्या उद्योजकीय कामांमध्ये समतोल राखला आणि हाच त्याच्या परिश्रमाचा दाखला आहे.

‘Trinet Solutions’ चालवण्याव्यतिरिक्त, आदित्यननं YouTube च्या जगातदेखील प्रवेश केला आहे. ‘अ क्रेझ’ या चॅनेलवर, तो त्याचं तंत्रज्ञान, कोडिंग, गेमिंग व वेब डिझाइनचं ज्ञान शेअर करत असतो. अॅण्ड्रॉइड ॲप डेव्हलपमेंटचे कोर्सेस ऑफर करून आदित्यन भविष्यात त्याचं YouTube चॅनेल वाढवण्याची योजना आखत आहे. त्याची धाकटी बहीणदेखील या चॅनेलसाठी व्हिडीओ फिल्मिंग करायला त्याला मदत करते.

हेही वाचा… लंडनमध्ये घेतलं बीबीएचं शिक्षण अन् सगळं सोडून धरली शेतीची वाट; वाचा वर्षाला कोटींची उलाढाल करणाऱ्या हर्षित गोधा यांची यशोगाथा

आदित्यनच्या आयटी कंपनीची अद्याप अधिकृतपणे नोंदणी झालेली नसली तरी, त्याच्या तीन शाळकरी मित्रांच्या मदतीने ती चालते. एकत्रितपणे त्यांनी १२ पेक्षा जास्त क्लायंटसाठी यशस्वीरीत्या प्रकल्प पूर्ण केले आहेत. जागतिक स्तरावर Trinet Solutions वाढवण्याची आणि iOS डिव्हायसेससाठी ॲप्स विकसित करण्याची आदित्यन आकांक्षा बाळगतो. सध्या तो त्याच्या शाळेतील शिक्षकांसाठी डिझाइन केलेल्या क्लास मॅनेजमेंट या ॲपवर काम करीत आहे आणि त्याच्या वर्गमित्रांना विविध प्रकल्पांवर तांत्रिक साह्य पुरवतो.

आदित्यन राजेशचा ॲप डेव्हलपर ते एक यशस्वी सीईओ, असा प्रवास ही यशाची आणि समर्पणाची एक उल्लेखनीय कथा आहे; जे हे दाखवून देते की, कठोर परिश्रमाने लहान वयातच विलक्षण यश मिळवता येते.