Success Story Abhishek Bakolia In Marathi : भारतीय परराष्ट्र सेवेतील प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक असलेल्या अपाला मिश्रा यांनी स्वतःचा जीवनसाथी निवडला आहे. अपाला मिश्रा या एक डेंटिस्ट आहेत. डेंटिस्ट ते सरकारी अधिकारी हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. तर अपाला मिश्रा यांनी अभिषेक बकोलिया (Success Story Of Abhishek Bakolia) यांना आपला जोडीदार म्हणून निवडले आहे, जे स्वतः एक आयएफएस अधिकारी आहेत. सोशल मीडिया पोस्टमध्ये, आयएफएस अधिकाऱ्यांच्या २०२१ बॅचशी संबंधित असलेल्या अपालाने २०२२ च्या बॅचचे सदस्य अभिषेक बकोलिया यांच्याबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात केली असं फोटो पोस्ट करत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवर अपालाने अभिषेकबरोबरचे चार फोटो शेअर केले असून त्यांना “Wedding vows” असे कॅप्शन दिले आहे. तथापि, त्यांनी अधिकृतपणे लग्नाची गाठ बांधली आहे की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. या पोस्टला आयपीएस अधिकारी नवज्योत सिमी आणि आयएएस अधिकारी रिया दाबी या प्रसिद्ध व्यक्तींनीही त्यांची पोस्ट लाईक केली आहे.

१९९७ मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अपाला मिश्रा यांचा जन्म झाला. वडील आणि भाऊ दोघेही भारतीय सैन्यात आहेत आणि आई जी. दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहे. अपाला मिश्रा शिस्त आणि समर्पणावर जोर देणाऱ्या वातावरणात वाढल्या. देहरादूनमधून दहावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अपालाने दिल्लीतील रोहिणीमधून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आर्मी कॉलेजमधून डेंटल सर्जरीमध्ये (BDS) बॅचलर डिग्री मिळवली, मात्र वैद्यकीय पदवी घेतल्यानंतरही समाजसेवेच्या इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले.

हेही वाचा…Success Story Of Nitin Shakya : डॉक्टर ते आयएएस अधिकारी, झोपडपट्टीतील मुलांची सेवा करताना मनात जागं झालं स्वप्न; जाणून घ्या नितीन शाक्य यांची गोष्ट

सार्वजनिक सेवेच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी वैद्यकीय करिअर सोडले. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये प्रिलिम्स क्लिअर झाले नाहीत, पण तिसऱ्या प्रयत्नात अपाला मिश्रा यूपीएससी परीक्षा केवळ उत्तीर्णच झाल्या नाही, तर त्यांनी नवा इतिहासदेखील रचला आणि ऑल इंडिया रँक ९ मिळवला.

पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

अभिषेक बकोलिया (Success Story Of Abhishek Bakolia) हा पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथील रहिवासी आहे. त्याने पंजाब चंदीगडमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणकशास्त्राची पदवी घेतली आहे. आयएसएस अधिकारी होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी जेपी मॉर्गन येथे इंटर्नशिप केली. तो मार्च २०२० मध्ये UPSC सिव्हिल सर्विसेस परीक्षा तयारीला लागला आणि २०२१ मध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्याने टॉपर्सच्या मुलाखती पाहून काही खास रणनीती तयार केल्या, ज्यामुळे त्याला तयारीला योग्य दिशा मिळाली आणि त्याने परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएफएस अधिकारी झाले.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of abhishek bakolia who husband of apala mishra read both ifs officers journey asp