Success Story of Adarsh Kumar: बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने BPSC 32 व्या न्यायिक सेवा परीक्षेचा अंतिम निकाल २०२४ जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांच्या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या कहाण्या समोर येत आहेत. त्यातील एक यशोगाथा म्हणजे औरंगाबादमधील शिवगंज येथील आदर्श कुमार यांची. BPSC ची ३२ वी न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आदर्श कुमार न्यायाधीश बनले आहेत.

वडिलांनी अंड्यांचा स्टॉल चालवून मुलांना केलं मोठं

आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही आदर्श यांनी हिंमत हरली नाही. आदर्श यांच्या वडिलांनी गाडीवर अंडी विकून आपल्या मुलांना शिक्षण दिले. आदर्श कुमार यांनी अत्यंत मागास वर्ग (EBC) श्रेणीत १२० वी गुणवत्ता प्राप्त केली आहे. मुलगा BPSC ची ३२ वी न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाला आणि वडिलांच्या कष्टाचे चीज झाले.

Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “मी मुख्यमंत्र्यांची विरोधक आहेच पण…”, बीड आणि परभणी प्रकरणी सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आवाहन
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
chhagan bhujbal meets devendra fadnavis
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यावर भुजबळ म्हणतात, “मी त्यांना सगळं सांगितलं आहे, त्यांनी ८-१० दिवस…”

हेही वाचा… लग्नाच्या १८ वर्षानंतर उत्तीर्ण केली UPPSCची परीक्षा, तीन मुलांना सांभाळत केली तयारी; वाचा दीपा भाटी यांचा प्रेरणादायी प्रवास

आईनेही कर्ज काढून मुलांना शिक्षण दिले

शिवगंज, औरंगाबाद येथे राहणारे आदर्श कुमार यांचे वडील विजय साव, गाडीत अंडी आणि ब्रेड विकतात. अशा प्रकारे ते आपल्या सात सदस्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी आपल्या बाजूने पैशांमुळे मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. त्यांची पत्नी सुनैना यांनीही बचत गटाकडून कर्ज घेऊन मुलांच्या शिक्षणात मदत केली. मात्र, कर्ज घेतल्याची बाब त्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांपासून लपवून ठेवली आणि कर्जाबाबत कधीही आपल्या मुलांना काहीही सांगितले नाही.

आई-वडिलांकडून मिळाली कष्ट करण्याची प्रेरणा

आदर्श सांगतात की, त्यांचे आई-वडील हेच त्यांचे देव आहेत आणि आज ते जे काही आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत. आई-वडिलांची मेहनत पाहून तितक्याच मेहनतीने आणि झोकून देऊन त्यांनी अभ्यास केला, त्यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… ‘जंगली’ म्हणून चिडवलं, शाळेतूनही काढून टाकलं; पण हार न मानता पठ्ठ्याने सुरु केला लाखोंचा व्यवसाय; वाचा सत्यम सुंदरमचा प्रेरणादायी प्रवास

१५३ उमेदवार यशस्वी झाले

BPSC 32 व्या न्यायिक सेवा मुख्य परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या ४६३ उमेदवारांसाठी १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान इंटरव्ह्यू राउंड आयोजित करण्यात आला होता. या राउंडसाठी एकूण ४५८ उमेदवारांनी हजेरी लावली. मुख्य परीक्षा (लेखी) आणि इंटरव्ह्यूमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे एकत्रित गुणवत्ता यादी तयार केली जाते. एकूण हजर झालेल्या उमेदवारांपैकी १५३ उमेदवार यशस्वी ठरले आहेत.

ज्युडिकल सर्विस इंटरव्ह्यू राउंडमध्ये सहभागी झालेले उमेदवार आता BPSC च्या अधिकृत वेबसाइट bpsc.bih.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. अंतिम निकालासोबतच आयोगाने कट ऑफ गुणही जाहीर केले आहेत.

Story img Loader