Success Story Of Aditya Srivastava In Marathi : यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे खूप कठीण बाब आहे. अनेक उमेदवार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परीक्षेत खूप मेहनत घेतात. या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ते जिद्द, मेहनतीसह सतत सराव करतात आणि त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात; तर केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल १६ एप्रिल २०२३ रोजी जाहीर केला होता आणि आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला. तर कसा होता आदित्य श्रीवास्तवचा प्रवास (Success Story Of Aditya Srivastava) जाणून घेऊया…
आदित्य लखनऊचा रहिवासी आहे. लखनऊच्या सीएमएस अलिगंज शाखेतून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले.आदित्य श्रीवास्तव हा १२वी मध्ये टॉपर होता, त्याला ९५ टक्के गुण मिळाले. त्याने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश केला. बीटेक आणि एमटेक केल्यानंतर सुवर्णपदक विजेता म्हणून बाहेर पडलेल्या आदित्य श्रीवास्तवला बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पगाराची नोकरी मिळाली आणि तो बंगळुरूमधील गोल्डमन सॅक्समध्ये रुजू झाला. इथे त्याने जवळपास १५ महिने काम करत युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी सुरू केली. काम करताना त्याने प्रीलिममध्ये पहिला प्रयत्न केला आणि अपुऱ्या तयारीमुळे तो अयशस्वी झाला. नंतर त्याने पूर्ण तयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अखेर उच्च पगाराची नोकरी सोडली.
एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी का सोडली? याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले की(Success Story Of Aditya Srivastava) , मी ज्या क्षेत्रातून आलो, त्या भागाचे ज्ञान मला होतेच. पण, त्याबरोबरच नागरी सेवांबद्दल मला आवड होती, त्यामुळे शेवटी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत तयारी केली.
हा प्रवास मी आयुष्यभर जपेन…
UPSC मध्ये AIR1 रँक मिळवण्यासाठी २०१७ पासून मेहनत केली. आयआयटीअन (IITian) ने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी २०२२ (UPSC 2022) ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि २१६ ची अखिल भारतीय रँक मिळवून आयपीएससाठी निवड झाली. त्याच्या आयपीएस प्रशिक्षणाव्यतिरिक्त तो यूपीएससी सीएसई २०२३ (UPSC CSE 2023) परीक्षेचा अभ्यास करत राहिला. २०२२-२३ यूपीएससी सीएसई (2022-23 UPSC CSE) अंतिम परीक्षेत त्याने प्रथम क्रमांक मिळविला, त्याची मार्कशीट व्हायरल झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने (एक्स ट्विटर) वर पोस्ट केले, “हा प्रवास मी आयुष्यभर जपेन, माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्वांचे कृतज्ञतेने आभार मानतो. स्वप्ने सत्यात उतरतात. त्याने निकालाचा स्क्रीनशॉटदेखील पोस्ट केला.
निकालानंतर सोशल मीडियावर यूपीएससी नागरी सेवा टॉपर आदित्य श्रीवास्तववर शुभेच्छांचा व प्रेमाचा वर्षाव झाला. त्याच्या मित्रांनी खास पद्धतीत या निकालाचं सेलिब्रेशन केलं. सगळ्या मित्रांनी त्याला उचलून घेतलं आणि जोरजोरात त्याच्या नावाचा जयघोष करू लागले व त्याला पूर्ण कॅम्पसमध्ये घेऊन फिरवून आणलं. या निकालदरम्यान हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता; तर असा होता आदित्यने श्रीवास्तवचा प्रवास (Success Story Of Aditya Srivastava).