Success Story Of Ajay Tewari : स्मार्ट डेटा (smartData INC) ने २ ऑगस्ट २०२४ रोजी आपला २५ वा वर्धापन दिन साजरा केला आहे; तर टेक्नोलॉजी आणि डेटा सोल्यूशन्स या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा कंपन्यांचा उद्देश विविध डेटा सेवा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि IT सोल्यूशन्स प्रदान करणे असतो. तर असाच काहीसा प्रयत्न अजय तिवारी (Success Story )यांनी केला आणि स्मार्ट डेटा इंडियाची स्थापना केली.

अजय तिवारी यांचा मर्चंट नेव्ही ऑफिसर ते उद्योजक असा प्रवास आहे. सागरी उद्योगातील ११ वर्षांच्या प्रभावी कारकिर्दीत त्यांनी ६० हून अधिक देशांमध्ये प्रवास केला आणि १९९९ मध्ये उद्योगाच्या जगात एक धाडसी पाऊल टाकले. त्यानंतर स्मार्टडेटा एंटरप्राइसेस (smartData Enterprises) या आयटी (IT) व्यवसाय सल्लागार कंपनीची स्थापना केली.

स्मार्टडेटा सुरू करण्याचे कारण काय?

अजय यांनी आयटी व्यवसाय सल्लागार बनण्यासाठी स्मार्टडेटा सुरू केला. त्यामध्ये स्मार्टडेटा AI, हेल्थकेअर, रिटेल, एडटेकसह विविध उद्योगांना सेवा , डेटा ॲनालिटिक्स आणि IoT सारख्या गोष्टींचाही समावेश आहे. कारण – ग्राहकांचे समाधान हे smartData च्या मिशनचा गाभा आहे. त्यांची परस्पर यशाची वचनबद्धता ही कंपनीच्या निरंतर वाढ आणि नवकल्पनांमागील शक्ती आहे.

हेही वाचा…Success Story : स्वस्त दरात लस देऊन उभारला कोटींचा व्यवसाय, जगातील श्रीमंतांच्या यादीतही आहे स्थान; वाचा सायरस पूनावाला यांचा प्रवास

अजय यांचे आयटी व्यवसायातील सल्ले ग्राहकांना धोरणात्मक दृष्टिकोन, सतत काहीतरी नवीन शिकण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली स्मार्टडेटा स्टार्टअप आणि एसएमईंना समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. तसेच हे केवळ टेक्निकल नव्हे तर मौल्यवान व्यवसाय सल्लादेखील देत असतात. स्मार्टडेटा ऑफरिंग सतत वाढवून, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, ग्राहकांचा प्रथम दृष्टिकोन काय आहे हे लक्षात घेऊन वेगाने विकसित होत असलेल्या टेक लँडस्केपमध्ये पुढे राहण्याची गरज अजय अधोरेखित करतात.

smartData च्या सीईओ पलीकडे अजय The Indus Entrepreneurs (TiE) चंदिगड चॅप्टरचे संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष आहेत; जिथे इच्छुक उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येते. तसेच पुढच्या पिढीला ते सल्ला देत म्हणाले की, प्रत्येकाने स्वतःच्या मूळ कल्पनांवर खरे उतरावे. अजय यांचे मार्गदर्शनासाठीचे समर्पण, नवीन व्यवसायांना पाठिंबा देण्याच्या, व्यवसाय समुदायामध्ये योगदान वचनबद्धतेचा पुरावा आहे; तर असा अजय तिवारी यांचा प्रवास (Success Story ) आहे.