Success Story of Akshay Agrawal : कधीकधी आपण क्षणात घेतलेला एखादा निर्णय आपले आयुष्य बदलून टाकते. त्यामुळे नेहमीच स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका अशी मोठी मंडळी आपल्याला आवर्जून सांगताना दिसतात. त्यामुळे जीवनात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तेव्हा इतरांची मदत घेण्याऐवजी तुमचे मन काय सांगतेय हे एकदा नक्की ऐका. तर आज आपण अशाच एका आयएएसची गोष्ट (Success Story of Akshay Agrawal ) जाणून घेणार आहोत, जो सिंगापूरमधील आपली नोकरी सोडून भारतात परतला आणि त्याच्या या निर्णयाने त्याचे आयुष्यच बदलले.
२०१८ मध्ये अक्षय अग्रवालने (Success Story of Akshay Agrawal) सिंगापूरमधील आपली नोकरी सोडली आणि भारतात परतला. पण, ही केवळ सामान्य घरवापसी नव्हती, तर त्यांचे जीवन बदलून टाकणारा एक निर्णय होता. अक्षयने त्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर सोडून लहानपणापासूनच त्यांच्या मनात असलेल्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेतील मित्राच्या यशाने प्रेरित होऊन आणि त्यांच्या वडिलांच्या प्रोत्साहनामुळे अक्षयने एक धाडसी पाऊल उचलले. त्याने नोकरी सोडली, पुस्तकांनी बॅग भरली आणि निर्धाराने भारतात परतला आणि स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने चालू लागला.
आपल्या प्रवासाबद्दल सांगताना अक्षय (Success Story of Akshay Agrawal) म्हणाला की, ‘मला सिंगापूरमध्ये खूप अस्वस्थ वाटत होते. मला घरी परत येऊन आपल्या देशाची सेवा करायची होती, हेच माझे खरे आवाहन होते.’ तर त्याच वर्षी अक्षयने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक (AIR) ४३ मिळवून- एक उल्लेखनीय कामगिरी केली. आज तो ओडिशा राज्यातील नयागड शहरात दंडाधिकारी म्हणून काम करत आहे.
अक्षय अग्रवालच्या यशाचे रहस्य (Success Story of Akshay Agrawal) :
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (PYQs)
अक्षय अग्रवालने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून अभियांत्रिकी केली. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात सुवर्णपदक मिळवले. यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी कॉर्पोरेट जगतात कामसुद्धा केले. नोकरी करत असताना तो आठवड्यातून ४० तास अभ्यास करायचा. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार-रविवारी तीन तास आणि मधल्या वारांना तो १२ तास अभ्यास करायचा.
सात महिने काम आणि अभ्यासाचा समतोल साधल्यानंतर शेवटी त्याने नोकरी सोडली आणि दररोज १० ते १२ तास त्याच्या परीक्षेच्या तयारीसाठी देण्यास सुरुवात केली. त्याच्या यशाच्या प्लॅनिंगमध्ये ध्येये, दृढ निश्चय, स्मार्ट रिव्हिजन प्लॅन आणि लक्ष विचलित होणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे आदींचा समावेश होता. पण, त्याचे सर्वात यशाचे रहस्य म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (PYQs)
यूपीएससीच्या तयारीमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका महत्त्वाच्या का आहेत?
अक्षयचा ठाम विश्वास आहे की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांसाठी सोन्याची खाण आहे. पॅटर्न, ट्रेंड आणि महत्त्वाचे विषय समजून घेण्यासाठी त्यांनी २० ते २५ वर्षांच्या मागील यूपीएससी प्रश्नपत्रिकांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले.
१. स्पॉटिंग पॅटर्न आणि ट्रेंड्स – या पेपर्सद्वारे त्यानी वारंवार थीम, ऐतिहासिक विषय आणि प्रश्नांचे स्वरूप ओळखले, यामुळे त्याला महत्त्वाच्या विषयांचा अंदाज लावण्यास आणि त्यावर प्रभावीपणे लक्ष केंद्रित करण्यात मदत झाली. त्यानी प्रिलिम्सपूर्वी किमान पाच हजार प्रश्न सोडवले.
२. स्ट्रॅटेजिक नोट मेकिंग – प्रत्येक मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकासाठी त्याने अतिरिक्त माहिती गोळा केली आणि त्याच्या नोट्स बनवून घेतल्या. उदाहरणार्थ, जर RCEP कराराबद्दल प्रश्न असेल, तर त्याने त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास केला. त्याचे सदस्य देश, भारताची भूमिका आणि संबंधित करार. या दृष्टिकोनामुळे त्याची विषयांची समज आणखीन वाढली.
३. इफेक्टिव्ह रिव्हिजन स्ट्रॅटेजी – अक्षयने अनेक वेळा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. त्याच्या शिक्षणाला एक वेगळे वळण मिळाले आणि तो कोणत्या विषयात मागे पडतोय हे सुद्धा जाणून घेतले. या दृष्टिकोनामुळे परीक्षेपूर्वी त्याचा आत्मविश्वास वाढला. सुसंगतता, स्ट्रॅटेजी आणि स्मार्ट प्रीपरेशन ही यूपीएससी यशाची गुरुकिल्ली आहे.
अक्षयचा प्रवास (Success Story of Akshay Agrawal )हे सिद्ध करतो की दृढनिश्चय, योग्य रणनीती आणि चतुराईने तयारी करून यूपीएससी परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणे शक्य आहे.