Success Story Of Amit Kataria In Marathi : आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण, काही लोकांनाच यात यश मिळतं. जे लोकं सातत्य, चिकाटीने अभ्यास करतात त्यांना या परीक्षेत यश मिळतंच. तुम्ही आतापर्यंत अनेक आयएएस अधिकऱ्यांच्या सक्सेस स्टोरी ऐकल्या आहेत. पण, तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत नागरी सेवक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याबद्दल माहिती आहे का? नाही… तर त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात(Success Story Of Amit Kataria) …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील सर्वात श्रीमंत नागरी सेवक म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी अमित कटारिया आहेत. अमित कटारिया मूळचे गुरुग्रामचे आहेत. अमित कटारिया बस्तरचे जिल्हाधिकारी असताना प्रसिद्धीच्या झोतात आले होते, जेव्हा ते सनग्लासेस घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते. हा असा एक क्षण होता, ज्याने ऑनलाइन बरीच चर्चा झाली. कारण एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याबरोबरच्या बैठकीदरम्यान सनग्लासेस घालणे हे प्रोटोकॉलच्या विरोधात असल्याचे अनेकांनी नमूद केले. २०१५ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बस्तर भेटीदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि पुढे त्यांना बस्तरमधून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर दिल्लीला बोलावण्यात आले होते. ते सध्या सात वर्षांच्या केंद्रीय प्रतिनियुक्तीनंतर छत्तीसगडमध्ये सेवा देत आहेत.

हेही वाचा…Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास

सरकारकडून फक्त एक रुपये पगार

त्याच्या संपत्तीचे श्रेय मुख्यत्वे त्याच्या कुटुंबाच्या रिअल इस्टेट व्यवसायाला दिले जाते, जो दिल्ली आणि आसपासच्या भागात पसरला आहे. त्यांना या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळते. एका रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती ८.९ कोटी रुपये आहे. पण, ते सरकारकडून फक्त एक रुपये पगार घेतात. अमित यांची पत्नी अस्मिता हांडा एक व्यावसायिक पायलट असून त्यांचा पगारही लाखात आहे. अमित कटारिया यांना प्रवास करायला प्रचंड आवडते. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ते वारंवार सुट्टीदरम्यान फिरायला गेलेल्या ठिकाणांचे फोटो शेअर करत असतात. कटारिया यांचा आयआयटी ग्रॅज्युएट ते नागरी सेवक आणि लक्षाधीश होण्याच्या प्रवासामुळे (Success Story Of Amit Kataria) ते आयएएस टीना दाबी आणि आयपीएस अमित लोढा यांच्याप्रमाणेच भारतातील सर्वोच्च नागरी अधिकाऱ्यांमध्ये एक प्रसिद्ध व्यक्ती बनले आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of amit kataria who initially drew a symbolic salary of just one rupees and he met prime minister narendra modi wearing sunglasses asp