Success Story Of Animesh Pradhan In Marathi : आई-वडिलांचा आधार मुलांसाठी खूप गरजेचा असतो. जिंकल्यावर मिठी मारणारे आणि हरल्यावर धीर देणारे, असा आधार आई-वडिलांशिवाय या जगात तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही. पण, हे ‘सुख’ काही जणांच्या नशिबात नसते. यशस्वी होण्याच्या मार्गात त्यांचे आई-बाबा त्यांची साथ सोडून जातात. काही जण यामुळे खचून जातात; तर अनेक जण त्यांचा प्रवास सुरू ठेवून मोठी झेप घेतात. आज आपण अशाच एका आयएएस अधिकाऱ्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत (Success Story); ज्यांनी देशातील सर्वांत अवघड व उमेदवारांचा कस पाहणाऱ्या यूपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक (AIR) २ मिळवून इतिहास रचला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिमेष प्रधान, असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचा ओडिशाच्या अंगुल भागातील तालचेर शहरात जन्म झाला. त्यांच्या जन्मस्थानी असलेल्या केंद्रीय विद्यालयात त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. २०१५ मध्ये कॉलेजचे शिक्षण घेत असताना त्यांचे वडील देवाघरी गेले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तंत्रज्ञानाच्या आवडीमुळे अनिमेषने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) राउरकेला येथून संगणक शास्त्रात पदवी घेतली. पण, आरोग्य सेवा, शिक्षण यांसारख्या मूलभूत सेवांसह तळागाळात जाऊन काम करण्याचा, तसेच अत्यवस्थ लोकांसाठी आपले योगदान देण्याचा त्यांचा हेतू होता. तो हेतू साध्य करण्यासाठी अनिमेष प्रधान यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते आणि ते त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता, स्वमेहनतीने अभ्यास करून पूर्ण केले.

हेही वाचा…Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट

अनिमेष यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वजिद्दीने यूपीएससीची तयारी सुरू केली. पण, नशिबात काही तरी वेगळेच लिहिलेले होते. शेवटच्या मुलाखतीची फेरी बाकी असताना बरोबर एक महिना आधी त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईला कर्करोगाने ग्रासले होते. पण, यूपीएससीमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना आईच्या निधनाचे दुःख अन् त्यामुळे आलेले नैराश्य यांच्यावर मात करून, पुढे होणाऱ्या यूपीएससी परीक्षेसाठी सज्ज राहण्याचीही तितकीच गरज होती. अनेक वैयक्तिक आव्हानांचा सामना करूनही अनिमेष यांनी आपल्या यशोमार्गावरील वाटचाल खंडित होऊ दिली नाही. या सर्वांचे श्रेय त्यांनी त्यांच्या पालकांच्या अतुलनीय प्रोत्साहन आणि समर्थनाला दिले. २०२२ मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

खचून न जाण्याची प्रेरणा (Success Story)

त्यानंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळवून त्यांनी इतिहास रचला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनणाऱ्या अनिमेश प्रधान यांनी तरुण वयात खूप काही पाहिले, जे अनेकांना खचून न जाण्याची प्रेरणा देईल. अनिमेश प्रधान यांना ओडिशा केडरमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. सीएसई २०२३ मध्ये अनिमेष यांच्याव्यतिरिक्त २४ व्या स्थानावर असलेल्या ओडिशाच्या प्रज्ञानंदन गिरी यांनादेखील होम स्टेट कॅडर देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of animesh pradhan who upsc 2nd topper become ias officer for giving marginalised people healthcare and education asp