Success Story Of Anudeep Durishetty In Marathi : अनेक भारतीयांसाठी यूपीएससी परीक्षेद्वारे आयएएस अधिकारी बनणे हे खूप मोठे स्वप्न असते. त्यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससी परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात. पण, काही मोजकेच जण ही परीक्षा उत्तीर्ण होतात. पण, यूपीएससी ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी इच्छुकांमध्ये उत्साही भावना, कठोर परिश्रम व दृढनिश्चय असणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक उमेदवार यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी अनेक वर्षे समर्पित करतात. अनेकदा त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कोचिंग क्लाससुद्धा लावतात. पण, आज आपण अशा एक विद्यार्थ्याबद्दल जाणून घेणार आहोत; ज्याने स्वअभ्यासाद्वारे यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवले आहे. तर हे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अनुदीप दुरीशेट्टी (Success Story Of Anudeep Durishetty) .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुदीप दुरीशेट्टी तेलंगणातील जगत्याल जिल्ह्यातील मेटपल्ली येथील रहिवासी आहेत. अनुदीप दुरीशेट्टी २०१७ मध्ये यूपीएससीचे टॉपर होते. पण, याआधी त्यांचे तीन प्रयत्न अयशस्वी ठरले होते. पण, ते खचले नाहीत. २०१७ च्या परीक्षेत अनुदीप यांनी ऑल इंडिया (AIR) 1 ही रँक मिळवून मी मधेच ध्येय सोडणाऱ्यांपैकी नाही हे दाखवून दिले. २०२५ पैकी ११२६ गुण मिळवून ते यूपीएससी परीक्षेत आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ठरले.

हेही वाचा…Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट

स्व-अभ्यासाद्वारे उत्तीर्ण होऊन दाखवल (Success Story Of Anudeep Durishetty)

अनुदीप दुरीशेट्टी यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण श्री सूर्योदय हायस्कूलमधून पूर्ण केले आणि श्री चैतन्य कनिष्ठ महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते राजस्थानमध्ये बीआयटीएस ( BITS) पिलानी येथे रुजू झाले आणि २०११ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.टेक. केले. महाविद्यालयानंतर, अनुदीप गूगलमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरीसाठी रुजू झाले. त्यांच्याकडे यूपीएससीचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हते. त्यांनी ही परीक्षा केवळ स्व-अभ्यासाद्वारे उत्तीर्ण होऊन दाखवली. फक्त त्यांनी मदतीसाठी काही ऑनलाइन संसाधनांचा आधार घेतला होता.

अनुदीप यांचे वडील डी. मनोहर हे तेलंगणा नॉर्दर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीत सहायक विभागीय अभियंता म्हणून काम करतात आणि त्यांची आई ज्योती या गृहिणी आहेत. त्यांच्या कधीच हार न मानणाऱ्या वृत्तीने त्यांना यश मिळवण्यास खूप मदत केली (Success Story Of Anudeep Durishetty).

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of anudeep durishetty who cleared this examination solely through self study and become upsc topper asp