Success Story Of Anumula Jithendar Reddy In Marathi : आयआयटी पदवीधरांचे उद्दिष्ट हे नेहमीच उच्च पगाराच्या कॉर्पोरेट नोकऱ्या किंवा यशस्वी अभियांत्रिकी कारकिर्दीकडे वळणे हे असते. पण, काही अशा व्यक्तीसुद्धा असतात; ज्यांना ज्ञानप्राप्तीची, नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची आवड असते. तर, आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत (Success Story Of Anumula Jithendar Reddy).

अनुमुला जितेंद्र रेड्डी असे या व्यक्तीचे नाव आहे. अनुमुला जितेंद्र रेड्डी यांचा जन्म तेलंगणा येथील वारंगल येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे पालक रामचंद्र रेड्डी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) मधील प्राध्यापक आणि आई शोभा, एक सरकारी शाळेतील शिक्षिका आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते. मोठा झाल्यावर जितेंद्रने गणित आणि विज्ञानात रुची दाखवली (Success Story Of Anumula Jithendar Reddy).

Gange Rape On Nurse in UP
Crime News : धक्कादायक! नर्सवर सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकली, पीडितेने सांगितल्या वेदना
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
eknath shinde ajit pawar
Video: एकनाथ शिंदेंवर ठाकरे सरकारप्रमाणेच वेळ ओढवणार? आता अजित पवारांकडे पुन्हा अर्थखातं गेल्यास काय करणार?
Girish kuber on regional party politics
Eknath Shinde: ‘भाजपाने प्रेमाने गळ्यात घातलेला हात हळूहळू गळफास होतो’, एकनाथ शिंदेंचं असंच होईल का?
India Young Cricketer Imran Patel Dies of Cardiac Arrest During Match At Chhatrapati Sambhajinagar Video viral
VIDEO: क्रिकेट विश्वात पसरली शोककळा, महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू; कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना
sonam khan bold photoshoot in 1990
‘या’ अभिनेत्रीने ९० च्या दशकात केलेलं बोल्ड फोटोशूट; आईने पाहिल्यावर केलेलं असं काही की…, तिनेच केला खुलासा
Woman Commando Photo Viral
Woman Commando : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील ‘या’ महिला कमांडोचा फोटो व्हायरल, काय माहिती आली समोर?

बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्यानंतर, त्याने आयआयटी (IIT-JEE) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआयटी बॉम्बे येथे प्रवेश मिळाला.तेथे असताना, त्यांनी केवळ पदवीच पूर्ण केली नाही, तर यूएसमधील QEA एड्युव्हेंचर्स आणि कॅलटेक SURFriends मध्ये इंटर्नशिपदेखील केली.

हेही वाचा…Success Story Of Ujjwal Kumar : स्वप्न सत्यात उतरलं! अंगणवाडी सेविकेचा लेक BPSC परीक्षेत आला अव्वल; वाचा, उज्ज्वल कुमारची गोष्ट

२०१० मध्ये आयआयटी जेईई ॲडव्हान्स (IIT-JEE Advanced) परीक्षेत ऑल इंडिया रँक १ मिळवली. जितेंद्र रेड्डी यांनी आयआयटी बॉम्बेमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक. पूर्ण केले. त्यांनी कॉर्पोरेट जगात पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी स्वित्झर्लंडमधील ETH झुरिच येथे पदव्युत्तर पदवी (M.Tech.) घेतली. ही जागतिक स्तरावरील एक प्रसिद्ध संस्था आहे. सध्या ते ईटीएच झुरिच आणि युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच यांचा संयुक्त कार्यक्रम, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोइन्फॉरमॅटिक्स येथे पीएचडी करीत आहेत.

आयआयटीमध्ये करिअर न करता निवडला वेगळा मार्ग

आयआयटीमध्ये करिअर न करता अनुमुला जितेंद्र रेड्डी यांनी सगळ्यात वेगळा मार्ग निवडला. त्यांनी २०१७ मध्ये ईटीएच झुरिच येथे एम.टेक. पूर्ण केले आणि पीएच.डी. करून आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवला. न्यूरोइन्फॉरमॅटिक्समधील त्यांचे महत्त्वपूर्ण संशोधन हा त्यांच्या समर्पणाचा पुरावा आहे, असं म्हणायला हरकत नाही. जितेंद्र रेड्डी यांची कथा आपल्याला याची आठवण करून देते की, ज्ञानाचा पाठपुरावा करिअरच्या पारंपरिक मार्गांपेक्षा अधिक परिपूर्ण असू शकतो. त्यांचा प्रवास यशापेक्षा शिकण्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करतो. शिक्षण हा आयुष्यभराचा खजिना आहे हे अनुमुला जितेंद्र रेड्डी यांनी सिद्ध करून दाखवले आहे (Success Story Of Anumula Jithendar Reddy).