Success Story Of Ashok Khemka In Marathi : ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी (IAS) अशोक खेमका हे देशातील सर्वाधिक चर्चेत असलेले आयएएस अधिकारी आहेत. सेवा कारकिर्दीत त्यांची ५७ वेळा बदली झाली आहे. ३३ वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीनंतर अशोक खेमका यांची परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्तीच्या अवघ्या पाच महिन्यांपूर्वी त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२५ रोजी ते निवृत्त होणार आहेत. तर त्यांचा प्रवास कसा होता ते थोडक्यात जाणून घेऊ (Success Story Of Ashok Khemka)…
१९९१ च्या तुकडीचे अधिकारी म्हणून खेमका यांनी यापूर्वी प्रिंटिंग आणि स्टेशनरी विभागात एसीएस म्हणून काम केले होते. त्यांनी १९९४ तुकडीचे आयएएस अधिकारी नवदीप व्रिक यांची जागा घेतली आहे. जवळपास अनेक वर्षांनंतर अशोक खेमका परिवहन विभागात परतले आहेत. भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील परिवहन आयुक्त म्हणून अशोक खेमका यांचा यापूर्वीचा कार्यकाळ केवळ चार महिने टिकला होता. त्या काळात त्यांनी मोठ्या आकाराच्या ट्रक आणि ट्रेलर्सना फिटनेस प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आणि त्यामुळे जानेवारीमध्ये ट्रकचालकांचा संप झाला. सरकारने ट्रकचालकांना केंद्रीय मोटार वाहन नियमांचे पालन करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिल्याने संप संपुष्टात आला (Success Story Of Ashok Khemka).
सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात (Success Story Of Ashok Khemka )
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत,अशोक खेमका यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमी लढा दिला. दररोजच्या आठ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मिळत असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. अशोक खेमका यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पत्र लिहून आपली भावना कळवली आहे. तसेच हरियाणाच्या राज्य दक्षता विभागाचा प्रमुख म्हणून नियुक्ती मिळावी, अशी मागणीसुद्धा केली. या सर्व गोष्टींमुळे त्यांची अनेकदा कमी दर्जा असणाऱ्या प्रमुख विभागांमध्ये बदली झाली आहे. म्हणजेच जवळजवळ सरासरी दर सहा महिन्यांनी त्यांची नवीन पोस्टिंग व्हायची. अशोक खेमका यांनी याआधी ट्विट करताना, “सरळ झाडे नेहमीच आधी कापली जातात,” या शब्दांत करिअरच्या प्रगतीबद्दल निराशा व्यक्त केली. पण, आता अशोक खेमका पुन्हा मुख्य भूमिकेत परतल्यामुळे ते वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि सुधारणा आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवतील, अशी अपेक्षा केली जात आहे.