Success Story Of Man Behind Gopal Snacks : एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी काय लागते, तर आपली स्वतःची अनोखी कल्पना आणि मग त्यासाठी पुरेशी रक्कम, मार्केटचा अभ्यास, व्यवसायाचे फायदे व तोटे, योग्य वेळी योग्य निर्णय, खास व्यक्तींची साथ. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची गोष्ट (Success Story) व्यवसायाच्या सखोल जाणिवेचा पुरावा आहे. ‘गोपाल स्नॅक्स लिमिटेड’चे ​​(Gopal Snacks Limited) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने या व्यक्तीने आपल्या उपक्रमाचे रूपांतर कोट्यवधी रुपयांच्या कंपनीत केले, ज्यामुळे हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा स्नॅक्स ब्रँड बनला आहे.

तर या ब्रँडला चौथ्या क्रमांकापर्यंत घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे बिपीनभाई विठ्ठल हदवानी (Bipinbhai Vitthal Hadwani). त्यांचा सायकलवर फराळ विकण्यापासून ते फराळाचा कोट्यवधींचा व्यवसाय उभारण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची यशोगाथा ही कठोर परिश्रम, दृढनिश्चय व व्यवसायाची सखोल जाणीव यांचा पुरावा आहे. तर चला जाणून घेऊ त्यांची गोष्ट (Success Story) .

बिपिन हदवानी यांच्या वडिलांचे अस्सल गुजराती स्नॅक्स विकणारे एक छोटेसे दुकान होते. आपल्या वडिलांना व्यवसाय चालवताना पाहून बिपिन यांना उद्योजकतेची आवड निर्माण झाली. त्यांनी व्यापाराच्या मूलभूत गोष्टी शिकल्या आणि कौटुंबिक दुकानाच्या पलीकडे व्यवसाय वाढवायचा असे स्वप्न पाहू लागले. १९९० मध्ये बिपिन यांनी मित्रांबरोबर स्नॅक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त ४,५०० रुपये दिले. मात्र, चार वर्षांनंतर बिपिन यांच्या जोडीदाराने भागीदारी सोडली आणि त्याच्या वाट्याला अडीच लाख रुपये मिळाले. स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्याच्या निर्धाराने त्यांनी हे पैसे ‘गोपाल स्नॅक्स’ची स्थापना करण्यासाठी वापरले.

१९९४ पर्यंत, बिपिन आणि त्यांच्या पत्नीने एक धाडसी पाऊल (Success Story) उचलले. त्यांनी एक घर विकत घेतले आणि ते स्नॅक्स तयार करण्याच्या कारखान्यात बदलले. बिपिन राजकोटला व्यापारी आणि दुकानदारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी प्रवास करत असताना, त्यांच्या पत्नीने घरी फराळ तयार केला आणि त्यांनी राजकोटच्या रस्त्यावरून सायकलवरून हा फराळ विकला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे व्यवसायात सातत्याने वाढ होण्यास मदत झाली.

त्यांच्या स्नॅक्सची मागणी वाढल्याने बिपिनने राजकोटच्या बाहेर एक कारखाना सुरू केला. पण, काही कारणास्तव त्यांना हा कारखाना बंद करावा लागला. हार न मानता त्यांनी शहरात एक नवीन, छोटा कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज घेतले. या निर्णयाने सर्व काही बदलले आणि गोपाल स्नॅक्सने वेगाने विस्तार केला व लोकप्रियता मिळवली.

यश नेहमीच पदरात पडते…

आज, गोपाल स्नॅक्स हा भारतातील अग्रगण्य पारंपारिक स्नॅक्स ब्रँडपैकी एक आहे. कंपनीचे बाजार भांडवल ५,५०७ कोटी रुपये आहे. बिपिन हदवानी यांनी शून्यापासून सुरवात करून मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींची कंपनी उभारली. तसेच त्यांची कहाणी हे सिद्ध करते की, चिकाटी, हुशारीने निर्णय घेतल्यास यश नेहमीच पदरात पडते.

Story img Loader