Depen Morwani Success Story : जर तुम्ही काहीतरी साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा दृढनिश्चय केला असेल, तर यश तुमच्यापर्यंत नक्की येऊन पोहोचेल. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक जेईई (संयुक्त प्रवेश परीक्षा) पास करण्यासाठीही तुम्हाला हेच करावे लागते. जेईई म्हणजे आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)मध्ये शिक्षण घेण्याचे प्रवेशद्वार आहे. तर आज, आम्ही तुमच्यासाठी आयआयटी-जेईईमध्ये ऑल इंडिया रँक ३० मिळविणाऱ्या देपेन मोरवानी (Depen Morwani) यांची प्रेरणादायी कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्हालाही नक्कीच आत्मबळ मिळेल.

२०१२ मध्ये देपेन मोरवानी यांनी जेईईची परीक्षा दिली आणि अखिल भारतीय स्तरावर ३० वा क्रमांक मिळवला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (सीएसई)मध्ये बी.टेक केले आणि २०१६ मध्ये पदवी प्राप्त केली. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी गोल्डमन सॅक्स येथे दोन वर्षे फायनान्शियल ॲनालिस्ट (वित्तीय विश्लेषक) म्हणून काम केले, जिथे त्यांनी आर्थिक व्यवस्थापन आणि विश्लेषणाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केले.

उच्च शिक्षण आणि संशोधन कार्य (Higher Education and Research Work)

आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक. पूर्ण केल्यानंतर देपेन यांनी आयआयटी मद्रासमधून डीप लर्निंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स (एमएस) पदवी मिळवली. गूगलमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी आयआयटी मद्रासमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणूनही काम केले. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये रिसर्च इंटर्न म्हणूनही अनुभव घेतला आहे.

सध्या देपेन मोरवानी हार्वर्ड येथे पीएचडी करीत आहेत. देपेन मोरवानी सध्या अमेरिकेत राहतात आणि हार्वर्ड विद्यापीठात पीएच.डी.च्या तिसऱ्या वर्षाला आहेत. त्यांचे संशोधन प्राध्यापक बोअज बराक व प्राध्यापक श्याम काकडे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. त्यांचे काम प्रामुख्याने सखोल शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिमायजेशन अल्गोरिदमच्या अंतर्निहित प्रेरक आधारावर लक्ष केंद्रित करते. तर, असा एकंदरीत देपेन मोरवानी यांचा प्रवास आहे.

Story img Loader