Success Story Of Dr Akram Ahmad : यशस्वी होण्यासाठी काही उद्योजकांना कठीण मार्गांचा सामना करावा लागतो. स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात अनेक अडथळे, अडचणी येऊनसुद्धा ते चिकाटी ठेवून स्वतःची स्वप्ने साकार करतात. तर सर्व अडथळ्यांवर मात करणार्‍या अशाच एका व्यावसायिकाची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत; ज्यांनी सहा लाख रुपयांची नोकरी सोडून स्वतःची कंपनी उभारली आहे. चला तर त्यांचा प्रवास (Success Story) लेखातून सविस्तर जाणून घेऊ या…

जीवन व संघर्ष (Success Story) :

डॉक्टर अक्रम अहमद असे त्यांचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्रम अहमद यांना फार्मासिस्ट बनून मेडिकल स्टोअर उघडण्याची इच्छा होती. शैक्षणिक पात्रता पाहता वडिलांनी लेकाला अन्नामलाई विद्यापीठात डॉक्टर ऑफ फार्मसी करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर विद्यापीठात अमेरिकेतील एका वक्त्याशी चर्चा करताना अहमद यांना वैद्यकीय क्षेत्रात इच्छुक व्यावसायिकांसाठी परदेशात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल माहिती मिळाली.

IAS Sreenath, Success Story
Success Story : कुली म्हणून करायचे काम, मोफत Wifi च्या मदतीने अभ्यास करून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS अधिकारी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shiju Pappen Business Success Story
Success Story: ५००० ची नोकरी करण्यापासून ते आठ कोटींची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
expert answer on career advice questions career advice tips from expert
करिअर मंत्र
Loksatta article on Competitive Examination education
स्पर्धा परीक्षा देणं उत्तमच, पण किती काळ? पुढे काय?
Success Story Of Satyam Kumar In Marathi
Success Story Of Satyam Kumar : सर्वात कमी वयात IIT मध्ये प्रवेश ते ॲपलमध्ये इंटर्नशिप; वाचा शेतकऱ्याच्या मुलाची यशोगाथा
Success Story of Dr. Prathap C. Reddy who goes to the office daily at 91 founder of Apollo Hospitals know his Net Worth
वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास
Phadke Road
दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

परदेशात संधी शोधण्याचा प्रयत्न :

अनेक संधींचा पाठपुरावा केल्यानंतर, अहमद यांनी मलेशियामध्ये फार्माकोलॉजी लेक्चर देण्याची पहिली नोकरी मिळवली आणि त्यांनी सिडनी, मलेशियामध्ये खूप चांगले काम केले. अहमद हे सिडनी विद्यापीठात पीएचडीसाठी शिकत होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम नोकरीच्या संधी शोधण्यासाठी भारत आणि इतर देशांतील विद्यार्थी, वैद्यकीय व्यावसायिक परदेशात स्थलांतरित होत आहेत. कारण त्यांना परवाना परीक्षा, आरोग्य सेवा क्षेत्रातील चांगल्या व उच्च पगाराच्या करिअरच्या मार्गांबद्दल जास्त ज्ञान नाही आहे हे त्यांच्या लक्षात आले. तर सिडनी चिल्ड्रन्स हॉस्पिटल्स नेटवर्कमध्ये संशोधन व्यवस्थापक म्हणून काम करत असताना, डॉक्टर अहमद यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म YouTube वर परदेशी वैद्यकीय नोकरीच्या संधींसाठी परीक्षांबद्दलचे ज्ञान सांगण्यास सुरुवात केली.

हेही वाचा…Success Story : झिरो ते हीरो! डॉक्टर बनण्याचे स्वप्न सोडलं अर्धवट अन्…; एका संकल्पनेतून उभारली अब्जावधींची कंपनी; वाचा कुंवर सचदेव यांची यशोगाथा

सहा लाख रुपयांची नोकरी :

त्यानंतर अक्रम अहमदने २०२२ मध्ये महिन्याला सहा लाख रुपये पगार असणारी नोकरी सोडून, ​​ Academically Global लाँच केलं; जे सिडनी आणि भारतात स्थित हेल्थकेअर EdTech प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. हे प्लॅटफॉर्म उच्च पगाराच्या परदेशी वैद्यकीय नोकऱ्यांसाठी परवाना परीक्षांची तयारी करण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिक अभ्यासक्रम ऑफर करते. तसेच बघता-बघता सुमारे अमेरिकन डॉलर ५० हजार रुपयांच्या $50,000 गुंतवणुकीसह सुरू केलेल्या Academically Global च्या अर्जदारांमध्ये वाढ झाली. सध्या EdTech प्लॅटफॉर्म ७५ देशांतील विद्यार्थ्यांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करण्यात मदत करते. EdTech प्लॅटफॉर्म स्टार्टअपदेखील महिन्याला दोन कोटी रुपये कमवते आहे. कोणत्याही विद्यार्थ्याची पार्श्वभूमी काहीही असो, त्या प्रत्येकाला यशस्वी होण्याची संधी मिळावी यासाठी डॉक्टर अहमद यांचा प्रयत्न आहे.