Success Story Of IPS officer Nitin Bagate : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी परिश्रमाची आत्यंतिक गरज असते. त्यामध्ये कोणताही शॉर्टकट शोधायचा नसतो. इतकेच नव्हे, तर प्रत्येकाने परिश्रमाची स्वतःची एक वेगळी व्याख्या तयार करण्याची खूप गरज असते, जी त्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकते. महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांची कथा या गोष्टीचे एक उत्तम उदाहरण आहे(Success Story). एसपी ऑफिसच्या (SP office) बाहेर भाजी विकण्यापासून ते त्याच कार्यालयात शिरावर डीएसपीची टोपी मानाने घालण्यापर्यंतचा त्यांचा उल्लेखनीय प्रवास अगदी अंगावर काटा आणण्यासारखा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीन बगाटे हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ते आपल्या गावी एसपी कार्यालयाजवळ भाजी विकायचे. प्रचंड अडचणी असूनही स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न त्यांनी कधीही सोडले नाहीत.

हेही वाचा…Success Story: कोण आहे कृष्णा अरोरा? ज्याने २५ व्या वर्षी खरेदी केली स्वतःची करोडोंची कार; वाचा, ‘त्याची’ गोष्ट

यशाचा मार्ग खडतर (Success Story)…

त्यामुळे नितीन यांनी प्रतिष्ठित यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. पण, त्यांना त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. त्यांनी यासाठी अनेक वर्षे मेहनत केली. तीन वेळा मुलाखतीचा टप्पा गाठूनही ते परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. पण, जिद्दीने पेटलेली व्यक्ती ज्याप्रमाणे माघार घेत नाही त्याप्रमाणेच नितीन हे अपयशाने कडू घोट पिऊनही आपल्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. त्याऐवजी त्यांनी अपयशांच्या धड्यांचा वापर आपले कुठे चुकले हे शोधण्यासाठी वापर केला. शेवटी २०१६ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण होऊन, आपले आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले.

यूपीएससी परीक्षार्थींठी टिप्स…

नितीन यांनी ‘लल्लनटॉप’ला (Lallantop) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यूपीएससीसाठी कशा प्रकारे तयारी केली याबद्दलच्या टिप्स सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला.

१. मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा : मूलभूत संकल्पनांचा सखोल अभ्यास करून, एक मजबूत पाया तयार करा.
२. अपडेट (अद्ययावत) राहा: चालू घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे नियमित वाचा.
३. समाज समजून घ्या : सामाजिक समस्या आणि त्यांचा लोकांच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजून घ्या.
नितीन यांच्या मते, शिस्त आणि सातत्य या यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी अत्यावश्यक बाबी आहेत.)

नितीन बगाटे यांचा प्रवास जीवनातील आव्हानांचा सामना करणाऱ्या असंख्य इच्छुकांना आज प्रेरणा देतो आहे. जिद्द, कठोर परिश्रम यांद्वारे कोणत्याही अडथळ्यांवर मात करता येते याचा पुरावा म्हणजे त्यांचा जीवनप्रवास आहे. आज नितीन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे डीएसपी म्हणून काम करीत आहेत. स्वप्ने कितीही मोठी असली तरी चिकाटीने ती सत्यात उतरवता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of f ips officer nitin bagate who selling vegetables outside an sp office to becoming a dsp on the same premises asp