Success Story of Anita Dongre: अनिता डोंगरे हिचा भारतीय फॅशन इंडस्ट्रीत झालेला उदय खूप खास आणि प्रेरणादायी आहे. केवळ दोन शिवणयंत्रांपासून तिने या प्रवासाला सुरुवात केली आणि आपल्या मेहनत व अतूट विश्वासाच्या बळावर कोट्यवधींचे साम्राज्य निर्माण केले. अनिताच्या कारकिर्दीने भारतीय फॅशनची व्याख्याच बदलून टाकली. आज तिने देशातील सर्वांत श्रीमंत आणि लोकप्रिय डिझायनरचा मान मिळवला आहे.

बालपण आणि प्रेरणा

अनिताची आई शिंपी होती आणि लहानपणी अनिता तिच्या आईने शिवलेले कपडे घालायची. आईकडून ती सर्जनशीलता आणि मर्यादित संसाधनांचा प्रभावी वापर कसा करायचा ते शिकली. त्यातून निर्माण झालेल्या अधिक आवडीमुळे अनिताला लहानपणापासूनच फॅशन डिझायनिंगकडे आकर्षित केले. नोकरदार महिलांसाठी स्टायलिश आणि परवडणाऱ्या किमतीतील कपड्यांचा अभाव असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातूनच तिला तिची स्वप्ने सत्यात उतरवण्याची प्रेरणा मिळाली.

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
Akali Leader Sukhbir Singh Badal Attacked at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुवर्ण मंदिराबाहेर सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार! घटनेचा थरारक Video आला समोर
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”

हेही वाचा… शेवटी कष्टाचं फळ मिळालंच! गावातील मुलीने कोचिंगशिवाय केला अभ्यास, एकाचवेळी मिळवल्या चक्क तीन सरकारी नोकऱ्या

कारकीर्द

१९९५ मध्ये अनिताने वडील आणि बहिणीकडून छोट्या स्वरूपातील कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला. एका साध्या अपार्टमेंटमधून तिने महिलांसाठी वेस्टर्न वेअर डिझाईन करायला सुरुवात केली. अनेकदा नकारांचा सामना करूनही तिचा आत्मविश्वास डगमगला नाही. तिने आपला पहिला ब्रॅण्ड AND लाँच केला, ज्याने तिच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले.

ब्रॅण्डचा विस्तार

एका छोट्या शिलाई कारागीराच्या दुकानातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज एक नावाजलेला ब्रॅण्ड बनला आहे. तिच्या पोर्टफोलिओमध्ये ग्लोबल देसी, अनिता डोंगरे ब्रायडल कॉउचर, ग्रासरूट्स व पिंक सिटी यांसारख्या अनेक प्रसिद्ध लेबल्सचा समावेश आहे. कालांतराने तिचे नाव सौंदर्य आणि नवीनतेचे प्रतीक बनले.

हेही वाचा… अंडी विक्रेत्याचा मुलगा होणार न्यायाधीश! आईने काढलेल्या कर्जावर घेतलं शिक्षण, वाचा आदर्श कुमार यांचा थक्क करणारा प्रवास

कोट्यवधींचे साम्राज्य

आज अनिता डोंगरे भारतभर २७० पेक्षा जास्त स्टोअर्स चालवते. २०२३ मध्ये तिच्या ब्रॅण्डची कमाई १,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. फोर्ब्सने तिला आपल्या यादीत भारतातील सर्वांत श्रीमंत महिला फॅशन डिझायनर म्हणून मान दिला आणि तिची एकूण संपत्ती ८३.२१ कोटी रुपये ($१० दशलक्ष) असल्याचा अंदाज वर्तवला.

Story img Loader