Success Story Of Tumbledry: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश मिळवणे ही एक आव्हानात्मक गोष्ट आहे. IIM सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून पदवीधर झालेले विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करतात, जे त्यांना व्यवसाय क्षेत्रात भरभराटीसाठी पूर्णपणे तयार करतात. तर असाच काहीस गौरव टिओटिया यांचा प्रवास आहे (Success Story Of Gaurav Teotia).

गौरव टिओटिया (Success Story Of Gaurav Teotia) हे भारतातील सर्वात मोठ्या लाँड्री आणि ड्राय-क्लीनिंग कंपनी टंबलड्राय (Tumbledry) चे सह-संस्थापक आहेत. २०१९ मध्ये स्थापन करण्यात आलेली टंबलड्राय (Tumbledry) आता देशभरातील ३६० हून अधिक शहरांमध्ये १००० हून अधिक स्टोअर्स चालवते आहे. टंबलड्री उभारण्यात गौरव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आयआयटी धनबादमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी टेक केले आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले, जी भारतातील व्यवसाय शाळांपैकी एक आहे.

Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
Bharat Gogawale on Eknath Shnde
“…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करेन”, गोगावलेंनी सांगितल्या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी
President Joe Biden's pardon for Hunter Biden
Joe Biden : नाही, नाही म्हणत जो बायडेन यांनी ‘तो’ निर्णय घेतलाच; शस्त्र आणि कर फसवणूक प्रकरणात शेवटच्या क्षणी…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? भाजपाने मांडली रोखठोक भूमिका
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

हेही वाचा…Success Story Of Anumula Jithendar Reddy : IIT चं घेतलं शिक्षण, पण कॉर्पोरेटमध्ये नोकरी न करता निवडला अनोखा मार्ग; वाचा, अनुमुला जितेंद्र रेड्डीचा प्रवास

टंबलड्राय (Tumbledry) च्या अधिकृत वेबसाइटनुसार, गौरव यांनी आयआयएममध्ये रँक केले होते आणि आयआयटीमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. त्याचप्रमाणे त्यांना स्ट्रॅटेजी, बिझनेस प्लॅनिंग आणि सेल्सचा सात वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी एअरटेल, LAVA आणि DRDO सारख्या प्रसिद्ध संस्थांबरोबरसुद्धा काम केले आहे. सीईओ इनसाइट्सच्या मुलाखतीत गौरव यांनी टंबलड्री सुरू करण्यामागील गोष्ट सांगितली होती. त्यांनी नमूद केले की, २०१६ आणि २०१८ दरम्यान दक्षिण पूर्व आशियाच्या त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी आणि सह-संस्थापक नवीन चावला आणि गौरव निगम यांच्या लॉंड्री उद्योगाचे निरीक्षण केले (Success Story Of Gaurav Teotia).

नोएडामध्ये पहिले स्टोअर उघडले

समान उत्पन्न पातळी असूनही भारतात लॉंड्री सेवा देणारी सुसंगत बाजारपेठ नव्हती. ही तफावत दूर करण्यासाठी या तिघांनी भारतात या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. नोएडामध्ये त्यांचे पहिले स्टोअर उघडल्यानंतर त्यांचा खरा प्रवास सुरू झाला. गौरव यांच्या नेतृत्वाखाली, टंबलड्रायने गेल्या चार वर्षांत प्रभावी महसूल वाढ अनुभवली आहे. आर्थिक वर्ष २०१९ ते २०२० मध्ये कंपनीने ६.५ कोटी रुपयांची कमाई केली. हा आकडा लक्षणीयरीत्या वाढला आणि आर्थिक वर्ष २०२० ते २०२१ मध्ये १४.४ कोटी रुपयांवर पोहोचला. आव्हाने आणि कोविडसंबंधित निर्बंधांचा सामना करूनही, टंबलड्रायने आर्थिक वर्ष २०२१ ते २०२२ मध्ये त्यांची आर्थिक वाढ कायम ठेवली, ज्यामुळे २४.३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२३ मध्ये ब्रँडने उल्लेखनीय वाढ नोंदवली आणि ११६ कोटी रुपयांची कमाई नोंदवली, ज्यामुळे ३७७ टक्क्यांची वाढ झाली, तर असा गौरव टिओटिया यांचा प्रवास आहे (Success Story Of Gaurav Teotia).