Success Story Of IAS Athar Khan In Marathi : यूपीएससी परीक्षा ही भारतातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी परीक्षा देणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांमधून ही परीक्षा पास होणे म्हणजे छोटी गोष्ट नाही. या परीक्षेला बसणारे बरेचसे विद्यार्थी स्वअभ्यास, कोचिंगद्वारे आणि काही जण परिस्थितीवर मात करून, अनेक वेळा अपयश पत्करूनही खचून न जाता आयएएस अधिकारी बनण्याचे ध्येय पूर्ण करतात. अशा यशस्वी व्यक्तींचा प्रवास पाहून अनेक जण प्रेरणा घेतात. तर, आज आपण यूपीएससी टॉपर असलेल्या अतहर खानच्या प्रेरणादायी यशोगाथेबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत, जे एक लोकप्रिय आयएएस अधिकारी आहेत (Success Story Of IAS Athar Khan).

अतहर आमिर-उल-शफी खान यांचा जन्म १९९२ साली काश्मीरमधील अनंतनाग भागातील देवीपुरा-मत्तन गावात झाला. त्यांचे वडील मुहम्मद शफी खान हे शिक्षक होते. अतहर आमिर खान यांचे शालेय शिक्षण अनंतनागमधील एव्हरग्रीन पब्लिक स्कूल आणि इक्बाल मेमोरियल इन्स्टिट्यूट, तसेच श्रीनगरमधील बिस्को स्कूल, टिंडेल बिस्को स्कूलमध्ये आदी वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले.

sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
delhi high court slammed aap government over cag bjp criticizes after court comment
‘कॅग’वरून ‘आप’ सरकारवर ताशेरे ; उच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर भाजपची टीका
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

अतहर खान यांनी हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी हिमाचल प्रदेशातील आयआयटी मंडी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये बी.टेक. केले. त्यांनी अभियांत्रिकी कारकिर्दीनंतर नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यासंबंधित सल्ला घेण्यासाठी ते जम्मू आणि काश्मीरमधील २००९ मधील यूपीएससी टॉपर शाह फैसल यांच्याकडे गेले. तिथे त्यांना भारतीय रेल्वे वाहतूक सेवेकडून नोकरीची ऑफर मिळाली. तेव्हा त्यांनी आयएएस व्हायचे ठरवले होते. म्हणून ते त्यासाठी तयारीसुद्धा करत होते.

हेही वाचा…Success Story Of Junaid Ahmad : अनेक वेळा अपयश येऊनही पूर्ण केलं आयएएस होण्याचं स्वप्न; वाचा, जुनैद अहमद यांची गोष्ट

कुटुंबातील पहिले सरकारी कर्मचारी (Success Story Of IAS Athar Khan)

अतहर खान २०१५ मध्ये ते यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले. या परीक्षेत त्यांनी अखिल भारतीय दुसरी रँक (AIR) मिळवली आणि अशा प्रकारे ते त्यांच्या कुटुंबातील पहिले सरकारी कर्मचारी ठरले. अतहर आमिर खान (IAS) वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी ही देशातील सर्वांत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यूपीएससीची परीक्षा एकदा देऊन, दुसऱी रॅंक मिळविल्यानंतर त्यांना आयएएस अधिकारी पदावर नियुक्ती झाली. आयएएसचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना राजस्थान केडरमध्ये नियुक्त करण्यात आले.

त्याचप्रमाणे अतहर खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे आणि आयएएस टीना दाबी यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. टीना आणि अतहर यांची त्यांच्या आयएएस प्रशिक्षणादरम्यान ओळख झाली होती . यूपीएससी परीक्षेत टीना डाबीने प्रथम आणि अतहर यांनी दुसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या परस्पर संमतीने, दोघांनी २०१२ मध्ये घटस्फोट घेतला. अतहर खान सध्या जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट आणि डेप्युटी कमिशनर म्हणून तैनात आहेत. त्याचप्रमाणे ते एक लोकप्रिय आयएएस अधिकारी आहे आणि त्यांचे इन्स्टाग्रामवर ७०५ के (705K) फॉलोअर्स आहेत; ज्यामध्ये ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अनेक गोष्टी पोस्टद्वारे शेअर करीत असतात (Success Story Of IAS Athar Khan).

Story img Loader