Success Story Of IAS officer Dr S Sidharth : यूपीएससी परीक्षेत उमेदवाराला मिळालेल्या रँकनुसार आयएएस अधिकाऱ्यांची निवड होते. या परीक्षेतल्या सर्वोत्तम रँकच्या उमेदवारांना आयएएसअंतर्गत असलेल्या पोस्ट्स दिल्या जातात. आयएएस अधिकाऱ्यांना मसुरीमध्ये संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. तिथे त्यांना प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा आणि सरकारी सेवांमधल्या प्रत्येक विभागाची माहिती दिली जाते. तर, आज आपण अशा एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक वर्ग कसे चालवतात यासाठी ओळखले जातात.
डॉक्टर एस. सिद्धार्थ हे आयएएस अधिकारी अशा कृत्यांसाठी ओळखले जातात, जिथे ते शाळा प्रशासन चांगले काम करते की नाही यासाठी अचानक तपासणी करतात. तर त्यांनी बिहारमधील शाळेतील शिक्षकांना केलेले व्हिडीओ कॉलमुळे सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिहारच्या शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलल्यानंतर काही दिवसांनी अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर एस. सिद्धार्थ यांनी सहज ऑनलाइन शाळा तपासणी सुरू केली.
शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक वर्ग कसे चालवतात आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांनी विविध जिल्ह्यांतील शाळेतील शिक्षकांना व्हिडीओ कॉल करण्यास सुरुवात केली. व्हिडीओ कॉल केल्यानंतर काही शिक्षक वर्ग चालवण्यात सक्रिय असल्याचे दिसून आले आणि त्यापैकी एक शिक्षक दुकान चालवताना आढळला. डॉक्टर सिद्धार्थ यांनी व्हिडीओ कॉल केल्यानंतर ते दुकानात बसलेल्या शिक्षकाला तर धक्का बसला.
डॉक्टर सिद्धार्थ अनेकदा शाळांच्या अचानक तपासणीसाठी ओळखले जातात, जिथे ते स्वतः प्रशासनाची तपासणी करण्यासाठी जातात. कधी कधी ते यासाठी ट्रेनने प्रवास करून शाळेत जातात. शिक्षकांची असमाधानकारक कामगिरी आढल्यावर ते वेळीच शिक्षकांची बदलीसुद्धा करतात.
कोण आहेत डॉक्टर एस. सिद्धार्थ? (Success Story Of IAS officer) :
डॉक्टर सिद्धार्थ हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी म्हणून १९८७ मध्ये संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. आणि माहिती तंत्रज्ञानात डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी १९८९ मध्ये प्रतिष्ठित आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले. सध्या त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून अर्थशास्त्रातून दुसरी पीएचडी करीत आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. एस. सिद्धार्थ हे एक प्रशिक्षित पायलटसुद्धा आहेत. त्यांनी २०२० ते २०२१ दरम्यान त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना वन्यजीवांचे छायाचित्रण करायला आवडते.