Success Story Of Hemant Pareek : कोणी आपला अपमान केला किंवा आपल्याला टोचून बोलले, तर आपल्याला साहजिकच राग येतो. मग आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलतो, मग भांडणं-वाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्त खराब होते. पण, आज आपण अशा आयएएस अधिकाऱ्याबद्दल (Success Story) जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या आईच्या अपमानाचे सडेतोड उत्तर देऊन, आईला न्याय मिळवून देण्यासाठी आयएएस अधिकारी होण्याचे ठरवले.
राजस्थानमधील एका ग्रामीण कुटुंबात जन्मलेल्या आयएएस अधिकारी हेमंत पारीक (Hemant Pareek) यांच्या करिअरच्या प्रवासात अनेक अडचणी होत्या. मात्र, तरीही त्यांनी देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत (सीएसई) ऑल इंडिया रँक (AIR) ८८४ मिळवला आणि त्यांच्या कुटुंबाचा अभिमान वाढवला. तर आज आपण त्यांच्याच प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
कोण आहे हेमंत पारीक?
हेमंत पारीक यांचा राजस्थानमधील एका घरात जन्म झाला. त्यांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. त्यांचे वडील शेतकरी होते आणि त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मनरेगा कामगार (MNREGA worker) म्हणून काम करीत असे. त्याचबरोबर त्यांच्या वडील आणि बहिणीला आरोग्याच्या समस्या याचबरोबर हेमंत पारीक स्वतः अपंगत्वाचा सामना करीत होते, त्यांचा एक हात व्यवस्थित काम करू शकत नव्हता. त्यामुळे उपजीविकेचा भार त्यांच्या आईवर पडला.
यादरम्यान काही कारणास्तव त्यांचे कुटुंब हरियाणाला स्थलांतरित झाले, जिथे त्यांची आई पैसे कमविण्यासाठी खासगी जमिनीवर (private lands) काम करीत होती. त्यावेळी एकदा एका कंत्राटदाराने हेमंत पारीकच्या आईला २२० रुपये देण्यास नकार दिला. तेव्हा हेमंतने कंत्राटदाराकडे याबद्दल विचारणा केली. तेव्हा कंत्राटदार थट्टा करीत हेमंत पारीकला म्हणाला, “तू कलेक्टर आहेस का?”… तर या अपमानामुळे हेमंत पारीकने आयएएस अधिकारी होण्याचा दृढनिश्चय केला (Success Story) . पण, नंतर काही महाविद्यालयीन मित्रांनी त्यांच्या आयएएस अधिकारी होण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली. पण, त्यांनी खचून न जाता तयारी सुरूच ठेवली.
हेमंत पारीक यांनी राजस्थानातील हनुमानगड येथील महर्षी दयानंद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर त्यांनी पदवीपूर्व शिक्षणासाठी कृषी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची (सीएसई) तयारी सुरू केली. २०२३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात (Success Story) हेमंत पारीक यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक (AIR) ८८४ मिळवला आहे.