Success Story Of IAS Siddharth Palanichamy : परीक्षा ही शाळा, कॉलेजची असो किंवा एखाद्या उच्च पदावर नियुक्त होण्यासाठीची. या परीक्षा संपेपर्यंत आपल्यातील अनेक जण मोबाईल, टीव्ही, मैदानी खेळ खेळणे या गोष्टी पूर्णपणे सोडून देतात. पण, एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्याग करण्याची खरंच गरज असते का? तर नाही… एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी फक्त तुमचा फोकस अथवा एखाद्या लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता महत्त्वाची असतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेवून एका अधिकाऱ्याने यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली (Success Story).

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर आयएएस अधिकारी सिद्धार्थ पलानीचामी (Siddharth Palanichamy) हे तमिळनाडूतील मदुराई या गावातले आहेत. ते राजस्थान केडरचे २०२० बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत १५५ ची अखिल भारतीय रँक मिळवली. युूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताना त्यांना कधीच आवडते चित्रपट, मॅच पाहणे, टेनिस खेळणे किंवा सोशल मीडिया बघण्यापासून स्वतःला वंचित ठेवण्याची गरज वाटली नाही. एवढेच नव्हे, तर आपल्या आवडीच्या गोष्टी करीतच त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली (Success Story) आणि भारतातील सर्वांत तरुण आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला.

हेही वाचा…Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…

वर्तमानपत्र वाचण्याची सवय (Success Story)

त्यांनी तिरुचिरापल्लीमधील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) या देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थेमधून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक.ची पदवी प्राप्त केली आहे. महाविद्यालयीन जीवनाच्या शेवटच्या वर्षात सिद्धार्थ यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनापासूनच त्यांना नियमितपणे वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागली होती.

एनआयटी त्रिचीमधून पदवी घेतल्यानंतर सिद्धार्थ पलानियाचामी यांनी नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष ब्रेक घेऊन दिल्लीत अभ्यास सुरू केला. अनेक पॉडकास्ट ऐकले, व्याख्यानांमध्ये सहभाग घेतला आणि इन्स्टाग्राम व ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापरही केला. पुस्तके, लेक्चर्स, कंन्टेन्टव्यतिरिक्त सोशल मीडियाने विशेषतः त्यांना नीतिशास्त्र पेपर (Ethics paper) लिहिण्यासाठी नवीन दृष्टिकोन प्रदान केला. त्यांचा असा विश्वास आहे की, नागरी सेवा परीक्षेसाठी प्रत्येक वर्षी सात्याने बदलणारी परीक्षा प्रक्रिया आणि नवीनतम दृष्टिकोन यांसह स्वतःला अद्ययावत ठेवणे खूप जास्त आवश्यक आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of ias siddharth palanichamy social media provided him with new viewpoints for writing the ethics paper asp