Success Story Of Inder Jaisinghani : शून्यापासून सुरुवात करणारे फार कमी लोक असतात. पण, जे शून्यापासून सुरुवात करतात त्यांना शून्याची भीती नसते असेही म्हणतात. तर अशाच एका व्यक्तीने मुंबईच्या लोहार चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्यापर्यंत त्यांचा प्रवास अनुभवला आहे; तर यांचे नाव आहे इंदर जयसिंघानी (Success Story Of Inder Jaisinghani) .

पॉलीकॅब इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इंदर जयसिंघानी यांनी स्वतःचे विश्व उभे केले आहे. फोर्ब्ज इंडियाच्या २०२३ च्या १०० भारतीयांच्या यादीत इंदर जयसिंघानी ३२ व्या स्थानावर आहेत. पण, हे स्थान गाठण्यासाठी त्यांना अत्यंत गरिबीतून वर यावे लागले आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीची सुरुवात एका छोट्या गॅरेजमधून केली आणि भारतातील वायर, केबल्सचे सर्वात मोठे उत्पादक बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
s and p global ratings
अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम राहणार – एसअँडपी; नवीन वर्षात मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर दिलासा शक्य

पण, सर्व अडचणींवर मात करून इंदर जयसिंघानी यांनी १५ व्या वर्षी शाळा सोडली. आज ते ८.६ अब्ज डॉलर्स (7,25,88,51,50,000 रुपये) संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.

इंदर जयसिंघानी यांची कथा मुंबईतील लोहार चाळीमध्ये सुरू झाली(Success Story Of Inder Jaisinghani) . वडिलांच्या अकाली निधनानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी जयसिंघानी यांनी वयाच्या १५ व्या वर्षी शाळा सोडली. कितीही कठीण प्रसंगातून ते जात असले तरी ते एक ना एक दिवस संपेल, या खात्रीने ते आयुष्य जगत राहिले. त्यानंतर ते व्यवसायात सामील झाले. पॉलीकॅबला यशाच्या शिडीवर चढण्यासाठी त्यांनी आपले घाम आणि अश्रू ओतले.

हेही वाचा…Success Story Of Chitraang Murdia : एकेकाळी होता आयआयटी टॉपर, डॉक्टर होण्यासाठी सगळंच सोडलं; वाचा, चित्रांग मुरडियाची गोष्ट

पॉलीकॅबचे अध्यक्ष आणि संचालक बनले

त्यानंतर जयसिंघानी १९९७ मध्ये पॉलीकॅबचे अध्यक्ष आणि संचालक बनले. त्यांनी नवीन बाजारपेठांमध्ये कंपनीच्या वाढीवर देखरेख केली आणि इलेक्ट्रिकल उत्पादन क्षेत्रात कंपनीचे नाव रोशन केले. २०१४ मध्ये पॉलीकॅबने केबल वायरशिवाय अनेक उत्पादने इलेक्ट्रिक फॅन, स्विच आणि एलईडी लायटिंगमध्ये उत्पादने विकण्यास सुरू केली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतपणे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद स्वीकारले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि टीमवर्कद्वारे त्यांनी पॉलीकॅबला वायर आणि केबल्सचे देशातील सर्वात मोठे उत्पादक बनवले(Success Story Of Inder Jaisinghani) .

पॉलीकॅब वेबसाइटनुसार, जयसिंघानी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ५० वर्षांत व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. वेबसाइट पुढे त्यांचे वर्णन “मेक इन इंडिया” उपक्रमाचे समर्थक म्हणून करते, ज्यांनी देशांतर्गत आणि परदेशी दोन्ही बाजारपेठांसाठी देशाच्या नाविन्यपूर्ण उत्पादन क्षमतेला प्रोत्साहन दिले.

फोर्ब्स इंडिया रिच लिस्टचा अंदाज आहे की, जयसिंघानी यांची एकूण संपत्ती $8.6 अब्ज इतकी आहे, ज्यामुळे ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले आहेत. जयसिंघानी यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे पॉलीकॅब इंडिया लिमिटेडला भारतातील सर्वात मोठी वायर, केबल निर्माता आणि सर्वात वेगाने वाढणारी FMEG फर्म बनण्यास मदत झाली आहे. भारतातील शहरांमध्ये उत्कृष्ट सेवांबरोबरच Polycab ने जगभरातील ७० हून अधिक राष्ट्रांमध्ये ग्राहकांना सेवा दिली आहे.

Story img Loader