Success Story of Irfan Razack: कष्ट, अखंड मेहनत व सातत्यानं शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. अशाच अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली. इरफान रझाक (Irfan Razack) हे प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे सीएमडी आहेत. एका लहानशा सुरुवातीपासून त्यांनी भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्याचा पल्ला गाठला. व्यवसायाचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या इरफान रझाक यांचे वडील रझाक सत्तार यांनी १९५० मध्ये बंगळुरूमधील एका छोट्या कपड्यांच्या आणि टेलरिंगच्या दुकानातून प्रेस्टिज ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली.

या कंपनीने निवासी (Residential), व्यावसायिक (Commercial), किरकोळ (Retail), आदरातिथ्य (Hospitality) या विभागांमध्ये सुमारे २८५ प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. कंपनीचे ५४ प्रकल्प सुरू आहेत; ज्यामध्ये ७.५ कोटी स्क्वेअर फुटांचे बांधकाम होणार आहे. याच इरफान रझाक यांच्या यशाच्या प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Narayana Murthy Success Story
Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Deepinder Goyal Success Story
Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
raju shetti
कोल्हापूर: राजू शेट्टी यांनी चळवळीचा बाजार मांडला, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांची टीका
Success Story Of Sarvesh Mehtani
Success Story : स्पर्धात्मक परीक्षेत टॉप १० मध्ये येण्याचे स्वप्न, जेईई ॲडव्हान्स्डमध्ये मिळवले ३३७ गुण; वाचा सर्वेश मेहतानीचा प्रवास

हेही वाचा… Truck Driver Turned YouTuber: कर्ज घेऊन एकेकाळी चालवायचे घर अन् आता महिन्याला कमावतात १० लाख, वाचा युट्यूबर ट्रक चालकाचा रंजक प्रवास

वडिलांबरोबर करायचे शिवणकाम

इरफान रझाक (Irfan Razack) यांचा जन्म १९५० रोजी बंगळुरू येथे झाला होता. त्यांचे वडील शिवणकाम करीत असत. इरफान यांच्या वडिलांनी प्रेस्टिज कंपनी सुरू केली होती, जी नंतर अखंड मेहनतीनं इरफान रझाक यांनी खूप मोठी केली. इरफान हेदेखील वडिलांबरोबर शिवणकाम करायचे. एका प्रोजेक्टमुळे इरफान रझाक आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीने $१ अब्जाचा टप्पा गाठला. त्यानंतर प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सच्या शेअर्समध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली. कंपनीच्या यशामुळे DLF नंतर प्रेस्टिज कंपनी भारतातील दुसरी सर्वांत मोठी सूचीबद्ध प्रॉपर्टी फर्म झाली. ‘प्रेस्टिज प्रॉपर्टीज’च्या ग्राहकांमध्ये Apple, Caterpillar, Armani व Louis Vuitton सारख्या जागतिक ब्रॅण्डचा समावेश आहे.

कंपनीचा विस्तार करणे ठेवले सुरू

१९९० मध्ये बंगळुरूमधील त्यांचा दुसरा रिअल इस्टेट प्रकल्प विकल्यानंतर रझाक यांच्या निवृत्तीच्या योजनांवर चर्चा झाली. निवृत्तीच्या वेळेतही त्यांनी प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्सला विकसित करण्याचं आपलं काम सुरू ठेवलं. प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स बेंगळुरूशिवाय चेन्नई, कोची, कालिकत, हैदराबाद व मुंबई यांसारख्या शहरांमध्ये विस्तारलं आहे.

खेळाची आवड

रझाक (Irfan Razack) यांचे धाकटे भाऊ रिझवान व नोमान हे त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात महत्त्वाच्या भूमिका बजावतात. रझाक कुटुंबात उद्योजकतेची भावना खोलवर रुजलेली आहे. प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सच्या रिअल इस्टेटसह त्यांचे फॅब्रिक आणि टेलरिंगचे दुकान अजूनही सुरू आहे. व्यवसायासह रझाक यांना खेळाची आवड आहे. एका लहान कपड्यांच्या दुकानापासून ते अब्ज डॉलर्सच्या रिअल इस्टेट साम्राज्याच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास कठोर परिश्रम व दृढनिश्चयाच्या शक्तीचं उदाहरण देतो.

देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये मिळवले स्थान

२०२४ पर्यंत इरफान रझाक (Irfan Razack) यांची एकूण संपत्ती $१.३ अब्जापर्यंत झाली आहे. त्यामुळे भारतातील सर्वांत प्रभावशाली आणि यशस्वी उद्योजकांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान मजबूत झाले आहे. प्रेस्टिज इस्टेट प्रकल्प पुढील विकासआणि नावीन्यपूर्णतेसाठी तयार आहेत. रझाक यांचा वारसा देशभरातील इच्छुक उद्योजकांना प्रेरणा देत आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष २०१३ मध्ये १२,९३० कोटी रुपयांची विक्री नोंदवली. फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत २०० इतर भारतीयांसह रज्जाक यांचाही समावेश केला गेला होता.