Success Story Of IRS officer Vishnu Auti : वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एकाची गोष्ट (Success Story) सांगायचा इथे प्रयत्न आहे. बाबा हरिभाऊ, आई कैलासाबाई यांना तीन मुले होती, त्यातील एक म्हणजे आयआरएस अधिकार विष्णू औटी. विष्णू औटी यांचे बाबा तीन मुलांना पोटापाण्यासाठी दिवस-रात्र काम करायचे. यादरम्यान ते अनेकदा दिवसभर जेवायचेसुद्धा नाहीत, यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. वयानुसार शारीरिक श्रम करणे अधिक कठीण झाले. विष्णू औटी यांचे गाव दुष्काळाने होरपळलेले होते. या गावात एकही माध्यमिक शाळा नव्हती. वर्षानुवर्षे कोरड्या गावात पाण्याच्या कमतरतेमुळे पिके नष्ट व्हायची. याचा थेट परिणाम विष्णूच्या पालकांच्या नोकरीवर झाला. पीक नाही म्हणजे काम नाही, त्यामुळे कुटुंबाची समस्या आणखी वाढली.

त्याकाळी त्यांची आई पिठात भरपूर पाणी मिसळायची आणि पोळ्या करायची. विष्णू औटी यांचे आई-वडील कामाच्या शोधात पहाटे घरातून निघून जायचे. दुपारच्या जेवणाच्या वेळी आई-बाबा कामावरून येताना काही खायला घेऊन आले नाही. तर माझी बहीण माझ्या भूकेपासून लक्ष विचलित करण्यासाठी गोष्ट सांगायची. तर यादरम्यान विष्णू औटी यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, त्यामुळे विष्णू औटी यांचे जीवन कायमचे बदलले. शाळा शेजारच्या गावात चार किलोमीटर दूर होती. तरीही त्यांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

ते मराठी माध्यमात शिकत होते. त्यांच्या शाळेच्या वाटेवर एक गिरणी होती. घरातील त्रास कमी करण्यासाठी त्यांनी गिरणीच्या फरशीवर पडलेले पीठ गोळा करायला सुरुवात केली. विष्णू यांनी गावकऱ्यांना दोन ते तीन रुपयांत लांब अंतरावर पिशव्या घेऊन जाणे, कनिष्ठांना शिकवणे, उरलेले अन्न गोळा करणे अशा विविध कामांसाठी मदत करण्यास सुरुवात केली. हे सर्व करत असताना त्यांनी अभ्यासावरही तितकेच लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांना मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांनी दहावीच्या बोर्डात ७९% गुण मिळवले. हा पराक्रम गावात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. हा विष्णू यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.

हेही वाचा…success story : बाबांकडून प्रेरणा तर पाच लाखांचं कर्ज, ‘सॉरी मॅडम’ नावाने दुकान उघडून आज कोटींची करतायत उलाढाल; वाचा राज यांचा प्रवास

शाळेतील शिक्षक ते आयकर अधिकारी (Success Story) :

शिक्षणाचे महत्त्व, स्वतःच्या प्रदेशात शिक्षणाची कमतरता लक्षात घेऊन विष्णू यांनी आपले डी.एड (शिक्षण पदविका) पूर्ण केले आणि १९९९ मध्ये अध्यापनाची नोकरी स्वीकारली. जरी शाळा त्यांच्या गावापासून १५० किलोमीटर अंतरावर होती. यावेळी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची माहिती घेतली. तयारीसाठी फक्त त्याचे ज्ञान वाढवणे आवश्यक असल्याने, विष्णू यांनी आणखीन प्रयत्न करण्याचे ठरवले. शिवाय आपण अधिकारी झालो तर तळागाळात बदल घडवून आणू, असे त्यांचे मन सांगू लागले.

त्यानंतर कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्यांनी तयारी सुरू केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी.ए. केलं. अभ्यास करण्यासाठी त्यांनी सेकंड हँड पुस्तके खरेदी केली, वर्तमानपत्रावर अवलंबून राहिले. सहकाऱ्यांशी चर्चा करून, नोट्सची देवाणघेवाण केल्यानेही त्यांना फायदा झाला. २०१० मध्ये विष्णू यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि जळगावमध्ये विक्री विभागातील कर आयुक्त म्हणून त्यांना त्यांची पहिली पोस्टिंग मिळाली. हा दिवस संपूर्ण गावाने माझ्या कुटुंबासह साजरा केला. या क्षणी त्यांच्या वडिलांनी बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करताना दिलेला मोलाचा सल्ला आठवला जो असा होता की, “जीवनाने एक चक्र पूर्ण केले आहे.”

पण, विष्णू औटी यांना राष्ट्रीय स्तरावर सेवा करायची होती, त्यामुळे अशा प्रकारे २०१३ मध्ये त्यांनी संघ लोकसेवा आयोगाची तयारी सुरू केली. त्यांनी कोणतेही कोचिंग घेतले नाही. आयकर कार्यालयातील त्यांच्या व्यस्त नोकरीसह ते अभ्याससुद्धा करायचे. एक पुस्तक नेहमी त्यांच्या बाजूला असायचे. लंच ब्रेकमध्ये, रात्री, पहाटेदेखील ते अभ्यास करत असत. २०१६ मध्ये त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात १०६४ रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली.

गेल्या चार वर्षांत विष्णू यांनी अनेक कार्यालयांत फिरून काम केले आहे. विष्णू यांची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. एकेकाळी ते गिरणीत पडलेले पीठ गोळा करायचे. आज ते एक आयआरएस अधिकारी आहेत; जे भारताच्या कर संकलनात मदत करतात. यामुळे हे सिद्ध होते की, कोणत्याही परिस्थितीत असताना आपली कहाणी (Success Story) आपण बदलू शकतो; फक्त मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे.