Success Story of Jay K Mulchandani: जय के मुलचंदानी अवघ्या १४ वर्षांचे होते, जेव्हा त्यांनी त्यांच्या धान्याचे व्यापारी असलेल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. अगदी कमी वयापासून आपल्या वडिलांना केलेली मदत जय यांच्या कामाला आली ती अशाप्रकारे की, जय आता कोट्यवधी रुपयांच्या CoreB ग्रुप या कंपनीचे प्रमुख आहेत. ही कंपनी राजस्थानमधील एका छोट्या शहरातील एक अत्यंत यशस्वी ट्रेलर्स आणि अर्थमूव्हिंग मशिनरी बनवणारी आहे. भारतात ॲल्युमिनियम ट्रेलर आणि ५२ टन ट्रेलर्स सादर करणारी ही पहिलीच कंपनी आहे.

कोटपुतली, राजस्थान येथे राहणाऱ्या जय यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती आणि त्याच्या पालकांची इच्छा होती की, त्याने IIT मध्ये प्रवेश घ्यावा आणि आपलं करिअर घडवावं. मात्र, जय पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करू शकले नाहीत आणि आयआयटीमध्ये प्रवेश मिळवू शकले नाहीत.

vegetable section of the market yard will be open on Bhaubij
भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला विभाग सुरू, सलग सुट्ट्यांमुळे बाजार समिती प्रशासनाचा निर्णय
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?
Ulhasnagar, Kumar Ailani, kalani family, BJP MLA Kumar Ailani, Kumar Ailani news, Ulhasnagar latest news,
उल्हासनगरच्या आखाड्यात यंदा मोठा संघर्ष
pune it city Server down
लोकजागर : आयटी सिटीचा सर्व्हर डाउन!
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही: यशाकडे जाण्याची शिडी
Preloved Eco Haat, used products, clothes,
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…

जय यांनी दुसऱ्या कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आणि एका नामांकित ऑटो मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत नोकरी मिळवली, परंतु त्यांना ऑफर केलेल्या पगारामुळे त्यांचे मनोबल कमी झाले.

हेही वाचा… Success Story: ‘या’ उद्योजकाने ३० वर्षांच्या आधीच गाठला कोट्यवधींचा टप्पा; ‘हा’ व्यवसाय करून तरुण पोहोचला यशाच्या शिखरावर

जय यांनी प्रत्येक ट्रकच्या विक्रीवर कमिशन घेण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी, एका कार्यक्रमात उपस्थित असताना जय यांचे विक्री कौशल्य प्रतिस्पर्धी कंपनीच्या लक्षात आले. नंतर या कंपनीच्या व्यवस्थापकाने लवकरच जय यांना नवीन नोकरी आणि एक चांगले पॅकेज ऑफर केले.

“ट्रक विकण्यासाठी माझी बदली राजस्थानमधील बारमेर या वाळवंटी भागात झाली. माझ्यासाठी हा एक धक्का होता, कारण अशा ठिकाणी ग्राहकांना पिच करणे कठीण होते. पण, मला आढळले की सेकंड हँड आणि जुन्या ट्रकना तिथे खूप मागणी होती,” असं जय म्हणाले.

जय यांनी जास्त विचार न करता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. याला व्यवसाय सुरू करण्याची खोलवर रुजलेली इच्छा कारणीभूत होती.

हेही वाचा… Success Story: वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी पठ्ठ्याने सुरु केला स्वत:चा चहाचा ब्रॅंड; आज १०४ देशांमध्ये होतेय विक्री

कोणीतरी एकदा म्हटल्याप्रमाणे, जर एखाद्याने अनुभवाचा शहाणपणाने वापर केला तर कोणताही वेळ वाया घालवत नाही. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये नूतनीकरण केलेल्या जुन्या ट्रकची मागणी समजून घेऊन, जय यांनी निर्णय घेऊन तीन उत्पादन पर्यायांचा विचार केला – ट्रक, सुटे भाग (Spare Parts) किंवा ट्रेलर्स.

भारतात ॲल्युमिनियम ट्रेलर्स आणि ५२ टन ट्रेलर्स सादर करणारी ही पहिली कंपनी आहे. CoreB ग्रुपने २०१७ ला ८०० ट्रेलर्सच्या उत्पादन क्षमतेवरून आता प्रतिवर्षी दोन हजार ट्रेलर्सपर्यंत कार्य वाढवले ​​आहे.

कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ४० कोटी रुपयांची उलाढाल केली असून २०२१ च्या आर्थिक वर्षात CoreB ग्रुपने त्यांची अंदाजित उलाढाल १०० कोटी रुपयांवर नेली आहे.