Success story of Kamal Khushlani: कमल खुशलानी यांनी केवळ १०,००० रुपयांचे कर्ज घेऊन १,१५० कोटी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य उभे केले आहे. त्यांचा ब्रँड मुफ्ती (MUFTI) हे आज भारतीय फॅशन जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या मेहनत आणि स्वप्नांमुळे हे सगळं शक्य झाल्याचं या प्रवासातून कळतं. १९९८ मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवास बाईकवर कपडे विकण्यापासून करोडोंच्या व्यवसायापर्यंत गेला आहे. चला तर मग, कमल खुशलानी यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

वडिलांच्या निधनानंतर संकटांचा डोंगर कोसळला

कमल खुशलानी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. ते १९ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कमल यांनी एका कॅसेट कंपनीत काम करायला सुरुवात केली. कमल यांना फॅशनची आवड होती. त्यांचे मित्र आणि ओळखीचे लोक त्यांच्याकडून कपडे आणि स्टाईलबद्दल सल्ला मागायचे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.

Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
vinay hiremath post (1)
Vinay Hiremath: “खूप श्रीमंत झालोय, पण आता या आयुष्याचं करू काय?”, ८ हजार कोटींना कंपनी विकणाऱ्या विनय हिरेमठ यांच्यासमोर यक्षप्रश्न!

हेही वाचा… बाराव्या वर्षात लग्न अन् सासरच्यांचा छळ! पण हार न मानता २ रुपयांची कमाई करणाऱ्या ‘या’ महिलेने उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य

१० हजार रुपये उसने घेऊन काम सुरू केले

१९९२ मध्ये, कमल यांनी आपल्या मावशीकडून १०,००० रुपये उसने घेऊन पहिला व्यवसाय सुरू केला. ती शर्ट बनवणारी कंपनी होती. त्याचे नाव Mr & Mrs असे होते. त्यांनी घरातूनच जे त्यांचं ऑफिस आणि वेअरहाऊस दोन्ही होतं, डिझायनिंगपासून प्रोडक्ट्स आणि विक्रीपर्यंत सर्व काही स्वतः हाताळले. तथापि, या सुरुवातीच्या कामाने त्यांना एक पाया दिला. पण, कमल यांना काहीतरी मोठं करायचं होतं. १९९८ मध्ये त्यांनी मुफ्ती ब्रँड लॉन्च केला. यामुळे भारतीय पुरुषांची फॅशन आणखी बदलली. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. कोणतेही कार्यालय किंवा कर्मचारी नसताना कमल हे आपल्या दुचाकीवर सूटकेसमध्ये भरून दुकानदारांना कपडे विकत असे.

आज देशभरात दुकाने आहेत

मुफ्तीसाठी खरा बदल २००० च्या दशकाच्या सुरुवातीला आला. त्यानंतर ब्रँडने पुरुषांसाठी स्ट्रेच जीन्स आणली. या नवोपक्रमाचे ग्राहकांनी खूप कौतुक केले आणि मुफ्ती प्रसिद्ध झाले. ब्रँड लवकरच विस्तारला. कमल खुशलानी यांनी मुफ्तीचे खास ब्रँड आउटलेट उघडले. आज मुफ्तीचे देशभरात ३७९ विशेष ब्रँड स्टोअर्स, ८९ मोठ्या फॉरमॅट स्टोअर्स आणि १,३०५ मल्टी-ब्रँड आउटलेट आहेत. शून्य ते शिखरापर्यंतच्या या प्रवासात कमल यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.

हेही वाचा… एकेकाळी मित्रांकडून घेतली होती लाखोंची उधारी, आता उभारलीय १००० कोटींहून अधिकची कंपनी, वाचा नेमका कोणता व्यवसाय करते ‘ही’ व्यक्ती

असंख्य उद्योजकांसाठी प्रेरणा

ज्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत त्यांच्यासाठी कमल खुशलानी यांची कहाणी प्रेरणादायी आहे. कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी इरादे मजबूत असतील तर यश नक्की मिळते हे त्यांची ही कथा सांगते. कमल यांनी केवळ एक ब्रँडच निर्माण केला नाही, तर पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असा आदर्शही ठेवला. त्यांच्या कथेतून हे देखील दिसून येते की व्यवसायात केवळ पैसाच नाही तर नैतिक मूल्य देखील खूप महत्वाचे आहे.

Story img Loader