Success story of Kapil Garg: जयपूर येथे राहणारे कपिल गर्ग हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांनी MNC मध्ये आठ वर्षे काम केलं. त्यानंतर नोकरी सोडून रंगीबेरंगी मोजे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये त्यांची पत्नी विधी गर्गने त्यांना पूर्णपणे साथ दिली. त्यांच्या ‘ठेला गाडी’ कंपनीची वार्षिक उलाढाल आता कोटींवर पोहोचली आहे. कपिल यांनी २०१८ मध्ये फक्त एक लाख रुपयांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. चला तर मग, कपिल गर्ग यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१८ मध्ये सुरू केली होती कंपनी

जयपूरच्या कपिल गर्ग यांनी २०१८ मध्ये ‘ठेला गाडी’ (TG) नावाच्या कंपनीची पायाभरणी केली होती. हा एक ब्रँड आहे, जो किफायतशीर किमतीत मनोरंजक फॅशन ॲक्सेसरीज विकतो. कपिल यांनी हा ब्रँड सुरू केला, कारण त्यांना बाजारात मिळणारे कपडे आणि एक्सेसरीज बोरिंग वाटायचे. लोकांना काहीतरी नवीन आणि मजेशीर मिळायला हवं असं त्यांना वाटायचं.

हेही वाचा… अवघ्या १३व्या वर्षी विकले कपडे अन् आज उभारलं कोटींचं साम्राज; वाचा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक असलेल्या रवी मोदींची यशोगाथा

सुरुवातीला त्यांनी लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी कार्टून चित्रांसह रंगीबेरंगी मोजे डिझाइन केले. हळूहळू त्यांनी त्यांच्या प्रोडक्ट्सच्या यादीत आणखी गोष्टी समाविष्ट केल्या. यामध्ये टोट बॅग, बॉक्सर शॉर्ट्स, रुमाल आणि डोळ्यांचे मास्क यांचा समावेश होता.

५९-७९९ रुपयांच्या किमतीदरम्यान विकल्या वस्तू

आज ठेला गाडीकडे ११० पेक्षा जास्त प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्यांची किंमत ५९ ते ७९९ रुपये इतकी आहे. हे प्रोड्क्ट्स त्यांच्या वेबसाइट किंवा Amazon India वरून खरेदी केली जाऊ शकतात. Inc42 नुसार, हँडकार्टने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १.८ कोटी रुपये कमावले. २०२४ पर्यंत ५.५ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. यासाठी अधिक दुकाने आणि प्लॅटफॉर्मवर आपले प्रोडक्ट्स विकण्याची त्यांची योजना आहे.

थायलंडमध्ये असताना आली कल्पना

कपिल आणि विधी यांना रंगीबेरंगी सॉक्सची कल्पना त्यांच्या थायलंड ट्रिपदरम्यान आली. तिथे त्यांनी पाहिलं की मोठी माणसेही स्टायलिश मोजे घालतात. पण, भारतात असे मोजे फक्त मुलांसाठीच उपलब्ध होते. परदेशी ब्रँड महाग होते आणि त्याचा दर्जाही इतका चांगला नव्हता. चांगल्या दर्जाच्या फॅशनेबल ॲक्सेसरीज थेट लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा उद्देश होता. सॉक्ससह सुरुवात केल्यानंतर, त्यांनी त्यांच्या प्रोडक्ट्सच्या लिस्टमध्ये अधिक गोष्टी अ‍ॅड केल्या.

हेही वाचा… स्वप्नांपुढे सारे फिके! एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा

सुरुवातीला लोकांनी मारले टोमणे

कपिल गर्ग यांनी नोकरी सोडून हे काम सुरू केले तेव्हा लोकांनी त्यांना टोमणेही मारले. अनेक जण तर त्यांना वेडा झाला आहेस का, असंही म्हणाले. ठेला गाडीच्या यशाचं रहस्य कपिल यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीलादेखील जातं. त्यांनी तरुणांना लक्ष्य केले. त्यांनी ९० च्या दशकातील कार्टून कॅरेक्टचे मोजे बनवले, जे लोकांना खूप आवडले. ज्यांना नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी कपिल यांची कथा प्रेरणादायी आहे. त्यांची कथा हे सांगते की, एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of kapil garg who sell socks started the business of thela gaadi leaving engineering job now earns crores dvr