Success Story of Keshav Rai: सत्तावीस वर्षांचा केशव राय हा शाळेतील सरासरी विद्यार्थी होता आणि शैक्षणिकदृष्ट्या त्याचा फारसा कल अभ्यासाकडे नव्हता. त्याच्या सभोवतालच्या गोष्टी दुरुस्त करण्याच्या त्याच्या उत्सुकता आणि आवडीमुळे तो अभियांत्रिकी क्षेत्रात आला.

कॉलेजमध्ये असताना केशव त्याच्या मित्रांबरोबर स्टार्टअपच्या कल्पनांवर चर्चा करायचा; पण त्यातून काहीच निष्पन्न व्हायचं नाही.

sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
santosh juvekar reveals his experience to working with vicky kaushal in chhaava
“माझी सुट्टी होती, विकीने अचानक सेटवर बोलावून घेतलं अन्…”, संतोष जुवेकरने सांगितला ‘छावा’च्या सेटवरचा अनुभव, म्हणाला…
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?
Success Story Of Satvat Jagwani In Marathi
Success Story : दोन वर्षात सोडली आयआयटी, उघडलं स्वतःच युट्युब चॅनेल; वाचा टॉपर सत्वत जगवानीची गोष्ट
2025 Kawasaki Ninja 500 Features
2025 Kawasaki Ninja 500: स्टायलिश लूक आणि किंमतही कमी; कावासाकीची नवी स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच; जबरदस्त मायलेजही देणार
dhananjay munde vijay wadettiwar
पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार

परंतु, केशव स्वत:ची कंपनी सुरू करण्याबद्दल इतका गंभीर होता की, त्याने २०१५ मध्ये त्याच्या वडिलांना ॲप-आधारित व्यवसायासाठी निधी देण्याची विनंती केली.

पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. जे घडायचं असतं तेव्हाच घडतं. केशवचा पहिला स्टार्टअप अयशस्वी झाला. पण, नवनवीन शोध आणि शिकण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीने त्याला नंतर उद्योजकीय यश मिळवून दिले.

…अन् केशवने सोडलं घर

पहिल्या व्यवसायात अपयश आल्यानंतर केशवला (Success Story of Keshav Rai) काहीही न करता घरी बसणे कठीण झाले होते. एके दिवशी त्याने बॅग भरून बाहेर निघायचे ठरवले आणि चार दिवसांत परत येईन, असे आई-वडिलांना सांगून घर सोडले.

आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी डोक्यात कोणतीही कल्पना न आणता, तो तीन दिवस रस्त्यावर फिरला. तथापि, चौथ्या दिवशी केशव घरी परतत असताना, तो दिल्लीतील कौशांबी मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये बसला होता आणि एक माणूस त्याची बाईक पुसण्यासाठी धुळीचे फॅब्रिक शोधत होता, तेव्हा त्या माणसाला काहीही न सापडल्याने त्याने शेजारील बाईकचे डस्टर घेतले, बाईक पुसली आणि तो निघून गेला.

हेही वाचा… Success Story: योगा मॅटपासून के फिटनेस प्रोडक्ट्सपर्यंत, ‘या’ उद्योजकाने दोन वर्षांत केली ३० कोटींची उलाढाल

हे पाहून केशवला कल्पना सुचली. तो ताबडतोब त्याच्या वडिलांकडे गेला आणि त्याने आपल्या व्यवसायाची कल्पना मांडली. “मी माझ्या वडिलांना सांगितले की, आम्ही बाईक कव्हर बनवू शकतो; जे सेमी-ऑटोमॅटिक असेल आणि लोकांचा त्रास टाळेल. माझ्या वडिलांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी मला सहज पाठिंबा दिला”, असे केशव म्हणाला.

बाईक ब्लेझरची सुरुवात (Bike Blazer )

तेव्हा केशवने (Success Story of Keshav Rai) दुसरा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ च्या उत्तरार्धात बाईक ब्लेझर सुरू केले.

सुरुवातीला केशवने त्यांच्या घराच्या गच्चीवर या कव्हर्सचे उत्पादन सुरू केले. आता कंपनीची नवी दिल्ली व गाझियाबाद येथे दोन उत्पादन युनिट्स आहेत.

बाईक ब्लेझरची निर्मिती आणि उपयोग (All about Bike blazer)

उत्पादनाचे वर्णन करताना केशव (Success Story of Keshav Rai) म्हणाले, “बाईकचे कव्हर औद्योगिक दर्जाच्या नायलॉन टफेटा (पॅराशूट फॅब्रिक)पासून बनवले आहे; जे हवामानास प्रतिरोधक आहे. त्यात एक कल्पक यंत्रणा आहे, जी पावसानंतर साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी आणि आतील भाग कोरडे ठेवण्यास सक्षम आहे. तसेच उपकरणाच्या आत एक ओले कव्हरदेखील गुंडाळले जाऊ शकते.”

हेही वाचा… Success Story: ट्रक विक्रीपासून सुरुवात ते आज यशस्वी उद्योजक; राजस्थानमधील ‘या’ तरुणाने गाठलं तिशीच्या आत यशाचं शिखर

बाईक ब्लेझरमध्ये दुचाकीचे पार्किंग कव्हर येते, जे जलप्रतिरोधक आहे आणि वाहनांना धुळीपासूनदेखील वाचवते. हे यंत्र वाहनावर लावून बाईक किंवा कारला अगदी ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत कव्हर घालून देते, असे केशव म्हणतात.

बाईक ब्लेझरची आर्थिक वर्ष २१ पर्यंत १.३ कोटी रुपये इतकी वार्षिक उलाढाल दिसत आहे.

Story img Loader