Success story of Kokila: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडचणींनी भरलेला काळ येतो, परंतु त्या काळातून कसे लढायचे आणि कसे बाहेर पडायचे हे त्या व्यक्तीला माहीत असले पाहिजे. आज आपण एका अशा महिलेची कहाणी जाणून घेणार आहोत, जिने तिच्या कठीण काळातही हार मानली नाही आणि वयाच्या ४२ व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या महिलेचं नाव आहे कोकिला.
कोकिला यांनी स्वतः खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्या या व्यवसायातून दरमहा ३० लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. कोकिलांसाठी हे सर्व करणे सोपे नव्हते. चला तर मग कोकिलांच्या यशोगाथेबद्दल जाणून घेऊया.
एकेकाळी करायच्या सरकारी नोकरी
कोकिला यांनी गणितात बीएससी पदवी घेतली आहे. पूर्वी कोकिला दूरसंचार विभागात ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणून सरकारी नोकरीत होत्या. नंतर त्यांना पतीच्या कर्करोगाच्या आजाराबद्दल कळले. त्यांच्या पतीवर अनेक वर्षे कर्करोगाचा उपचार सुरू होता, त्यानंतर त्यांचे निधन झाले. कोकिला ४२ वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी त्यांचा नवरा गमावला.
लाकडाचा व्यवसाय केला सुरू
कोकिला यांच्या पतीच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी कोकिला यांच्यावर आली. पतीच्या उपचारामुळे कोकिलांकडे पैसेही नव्हते. कोकिला यांना तीन मुले होती, ज्यांची जबाबदारी कोकिला यांच्यावरच होती. कोकिला त्यांच्या पगारावर समाधानी नव्हत्या. अशा परिस्थितीत त्यांनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
लाकडी खेळणी बनवण्याचा सुरू केला व्यवसाय
कोकिला पूर्वी लाकडी पेट्या पुरवत असत. नंतर त्यांनी लाकडी खेळणी बनवून विकायला सुरुवात केली. यासाठी त्यांच्या मुलाने त्यांना खूप साथ दिली. आज कोकिला यांच्या उपक्रमाचे नाव ‘वुडबी टॉईज’ आहे, जे ११० प्रकारची खेळणी बनवते. लोकांना कोकिला यांची लाकडी खेळणी आवडू लागली आणि कोकिला यांचा व्यवसाय वेगाने वाढू लागला.