Success Story Of Krishna Arora : खूप कमी लोकांना लहान वयात यश मिळते. असे लोक लहान वयातच खूप श्रीमंत होतात. नोकरी आणि व्यावसायातले बारकावे ते कमी वयातच शिकून घेतात. कोणताही व्यवसाय किंवा नोकरी किंवा आणखीन काहीही; प्रत्येक गोष्टीत जोखीम ही असतेच. काही जण पराभव, अडचणींवर मात करून यश मिळवतात; तर काही जण निराश होऊन माघार घेतात. आपल्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल, मनात जिद्द असेल, तर कोणतेही स्वप्न वा यश मिळवणे कठीण नाही. त्यासाठी लागते ती अपार मेहनत आणि चिकाटी. हेच करून दाखवलेय एका तरुणाने; ज्याचे नाव कृष्णा अरोरा, असे आहे (Success Story).

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ वर्षीय उद्योजक कृष्णा अरोरा यांनी ‘रोल्स रॉईस’ (Rolls Royce) खरेदी करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे, ज्यामुळे तो स्वतःच्या कमाईने लक्झरी कारचा मालक बनणारा सर्वांत तरुण भारतीय ठरला आहे (Success Story). कृष्णा अरोराच्या या यशाने देशभरातील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि अनेकांना प्रेरित केले आहे.

२५ व्या वर्षी रोल्स रॉईसची मिळवली मालकी

कृष्णा अरोरा केवळ एक उद्योजक नाही, तर नेटवर्क मार्केटर, नेतृत्व प्रशिक्षक, प्रेरक वक्ता व अचिव्हर्स क्लबचा संस्थापकदेखील आहे. त्याच्या यशाचा प्रवास समर्पण आणि दूरदृष्टी यांवर आधारलेला आहे. कृष्णा त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत होता. अखेर २०२४ मध्ये कृष्णा अरोराने वयाच्या २५ व्या वर्षी रोल्स रॉईसची मालकी मिळवली. त्याची कार केशरी रंगाच्या इंटेरियरसह एक स्लीक ब्लॅक रोल्स रॉईस घोस्ट व आयकॉनिक स्टारलाईट हेडलायनर, एका विशेष बॅजसह कस्टमाइज करण्यात आलेली आहे.

हेही वाचा…Success Story : यूपीएससी केली क्रॅक! पहिले आयएएस अधिकारी ज्यांना मिळाली प्रतिष्ठित पदावर नियुक्ती; वाचा, त्यांची गोष्ट

या लक्झरी कारमध्ये सीव्ही ऑटोमोबाइल्स, दुबईमधील प्रीमियम युज्ड कार डीलरशिपकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी त्याला जवळजवळ चार महिने लागले. कृष्णाने हा अविस्मरणीय क्षण त्याच्या पालकांबरोबर शेअर केला, ज्यांना त्याच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान आहे. एका व्लॉगमध्ये या कार्यक्रमातील काही खास क्षण कॅप्चर करण्यात आले आहेत.

या व्लॉगमध्ये कृष्णाने त्याच्या फॉलोअर्ससाठी एक प्रेरणादायी संदेशदेखील शेअर केला आहे. तो म्हणाला, “सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द यांतूनच यश मिळते. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याला महत्त्व आहे, असे त्याने अधोरेखित केले’. भारतात नवीन रोल्स रॉईस घोस्टची किंमत सात कोटींहून अधिक आहे. तर, कर (taxes) नसल्यामुळे कृष्णाने दुबईमध्ये अधिक परवडणारा सौदा मिळवला आहे. पण, रोल्स रॉईसची मालकी असणे; मग ती नवीन असो किंवा पूर्व-मालकीची (pre-owned) असली तरी
ती बाबच मुळी यश, दृढनिश्चय यांचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. तसेच मदर्स प्राईडचे २२ वर्षीय संचालक पारस गुप्ता आणि केरळमधील ३३ वर्षीय उद्योजक अमजद सिथारा यांसारख्या रोल्स रॉईस कार असलेल्या इतर तरुण भारतीयांच्या यादीत आता कृष्णा अरोरा सामील झाला आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of krishna arora in marathi who purchase rolls royce in age of 25 this thing making him the youngest indian asp