Success Story of Kunwar Sachdev : आजच्या घडीला ९ ते ६ या वेळेतील नोकरीपेक्षा स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण, व्यवसाय करण्यासाठी पैसे, जागा आणि अनेक गोष्टींचा विचार मनात येतो आणि मग आपण डोक्यातून व्यवसायाचा विषय काढून टाकतो. पण, आज आपण अशा एक व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी आयुष्यात कितीही संकटे आली तरीही कठोर परिश्रम अन् झोकून देऊन प्रयत्न केल्याशिवाय मोठे यश पदरात पडू शकत नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. एकेकाळी बसमध्ये, घरोघरी पेन विकणारी व्यक्ती आज कोटींच्या कंपनीची मालक आहेत.

विक्रेत्यापासून ते यशस्वी उद्योजकापर्यंतचा त्यांचा प्रवास (Success Story) हे ध्येय निश्चित करून ते साध्य करणे ही गोष्ट जीवन कसे बदलू शकते याचे आकर्षक उदाहरण आहे. सचदेव यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. सचदेव यांचे वडील रेल्वेत लिपीक म्हणून काम करीत होते. त्यांचे सुरुवातीचे जीवन आर्थिक अडचणींचे होते. मात्र, आव्हानांना न जुमानता त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला. त्यांनी शिक्षणासाठी पैसे कमवण्याचे ठरवले आणि बसमध्ये, घरोघरी पेन विकले ही एक नम्रपणे केलेली सुरुवात त्यांच्या उल्लेखनीय यशाचा पाया बनली.

हेही वाचा…Success Story : देशातील श्रीमंतांच्या यादीत नाव असणारे बेनू गोपाल बांगूर नक्की आहेत तरी कोण? वय ९३ तर संपत्ती आहे इतकी; वाचा ‘त्यांची’ यशोगाथा

एकेकाळी टीव्ही केबलचे केले काम

सचदेव यांना डॉक्टर होण्याची इच्छा होती; पण वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्यांची स्वप्ने धुळीस मिळाली. परंतु, तेथे हार न मानता आणि वेळ वाया न घालवता त्यांनी आपले लक्ष इतर संधींकडे वळवले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी एका केबल कंपनीसाठी मार्केटिंगमध्ये काम केले, जिथे त्यांनी उद्योगातील लक्षणीय वाढीची क्षमता ओळखली. या समजुतीने त्यांना एक धाडसी पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी नोकरी सोडली.

कुंवर सचदेव यांच्या घरातला इन्व्हर्टरसारखा खराब व्हायचा. तेव्हा त्यांना समजले की, निकृष्ट दर्जाच्या सामग्रीमुळे ही समस्या वारंवार उदभवते. त्यानंतर त्यांनी स्वतः इन्व्हर्टर बनविण्याचा विचार केला. १९९८ मध्ये त्यांनी Su-Kam पॉवर सिस्टीम नावाची कंपनी स्थापन केली आणि इन्व्हर्टर बनविण्यास सुरुवात केली. त्यांची उत्पादने आतापर्यंत भारतातील एक लाखाहून अधिक घरांमध्ये बसवण्यात आली आहेत. आता कुंवर सचदेव यांची कंपनी अनेक सोलर उत्पादने बनवते. त्यांच्या या उत्पादनाला भारतातच नाही, तर परदेशांतही मागणी आहे. कुंवर सचदेव यांच्या व्यवसायात वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ झाली आहे. आज कुंवर सचदेव सुमारे २,३०० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. कुंवर सचदेव यांचा प्रेरणादायी प्रवास (Success Story) असा होता…